History, asked by 919405518240, 19 days ago

(ब) थोडक्यात टिपा लिहा. (कोणत्याही दोन) 1) मराठीतील बखरी 2) कृषी पर्यटन 3) प्रसारमाध्यमांशी संबंधित व्यावसायिक क्षेत्रे​

Answers

Answered by ybhosale512
3

1. मराठीतील बखरी :-

मराठीतील एक प्राचीन गद्य वाङ्मयप्रकार. यात वाका, करीणा, हकीकत, कैफियत, आत्मवृत्त, प्रसिध्द ऐतिहासिक स्त्रीपुरूषांची चरित्रे, त्यांच्यासंबंधीच्या आख्यायिका इत्यादींचा समावेश केला जातो.

बखरकार हा बहुधा कारकुनी पेशातला असल्याने फडातील कागदपत्रे जशी त्याला उपलब्ध असत, तव्दत तो कथापुराणांच्या वाचनश्रवणाने बहुश्रुतही झालेला असे. त्यामुळे काही बखरींच्या लेखनावर पुराणांचाही प्रभाव पडलेला दिसतो. आणि बखरीतील हकीकत फुलवून सजवून सांगितली गेल्याचे दिसते.‘बखर’ ह्या शब्दाच्या अनेक व्युत्पत्त्या आढळतात. त्यांपैकी ‘बक’ म्हणजे ‘बोलणे’ ह्या धातूपासून ‘बखर’ हा शब्द तयार झाला. असे राजवाडे म्हणतात, खबर, ह्या अरबी शब्दाच्या वर्णविपर्यासामुळे ‘बखर’ हा शब्द निर्माण झाला, असेही मत आहे. खुशालीची हकीकत, ह्या अर्थी असणाऱ्या ‘बिल्-खैर’ ह्या शब्दाचीच बखर, बखैर अशीही रूपे आढळतात आणि बखैर याचा अर्थ शिवाजीने करविलेल्या राजव्यवहाराकोशात आख्यायिका, असा दिलेला आढळतो. आख्यानात्मकता हा गुण बऱ्याच बखरींत प्रत्ययाला येतो, ह्याचे कारण यात असावे. बखरीचे लेखन फार्सी तवारिखांच्या अनुकरणातून झाले, असाही एक तर्क राजवाडे यांनी केला आहे. बकऱ्याच्या चामड्यावर लिहिण्याच्या अरबस्तानमधील प्रथेवरून बकर > बखर अशीही एक व्युत्पत्ती पुढे करण्यात आली आहे. बखरलेखनाची पंरपरा संस्कृत पुराणकथांकडे आणि वंशानुचरिताकडे जाते, असेही मत अलीकडे मांडले गेले आहे.

3. प्रसारमाध्यमांशी संबंधित व्यावसायिक क्षेत्रे :-

न्युज पेपर, न्युज रिपोर्टर,कॅमेरामॅन, मोबाईल, इंटरनेट, इत्यादी.

Similar questions