बुद्धिमापन चाचण्यांचे किती प्रकार पडतात
Answers
Explanation:
१) सर फ्रान्सिस गाल्टन यांनी बुद्धिमापन चाचणी तयार करण्याचा प्रयत्न केला. त्यांनी डोक्याचा आकार, प्रतिक्रिया काळ, दृष्टी तीक्ष्णता, श्रवण सीमा तसेच श्वसन क्षमता इत्यादी परिवर्त्यांच्या आधारे बुद्धिमापन करणारी चाचण्यांची मालिका तयार केली. परंतु या परिवर्त्यांचा बुद्धीशी विशेष संबंध नसल्यामुळे गाल्टनची बुद्धिमापन चाचणी विशेष उपयुक्त ठरली नाही.
(२) फ्रेंच मानसशास्त्रज्ञ आल्फ्रेड बीने यांनी फ्रेंच मानसशास्त्रज्ञ सायमन यांच्या मदतीने १९०५ मध्ये पहिली बुद्धिमापन चाचणी विकसित केली. म्हणून आल्फ्रेड बीने यांना 'बुद्धिमापन चाचण्यांचे जनक' म्हणतात. या चाचणीची १९०८ मध्ये व त्यानंतर १९११ मध्ये सुधारित आवृत्ती काढण्यात आली.
(३) स्टॅनफोर्ड विदयापीठातील लेविस टर्मनने १९१६ मध्ये बीनेच्या चाचणीची सुधारित आवृत्ती काढली. ही चाचणी स्टॅनफोर्ड-बीने चाचणी या नावाने ओळखली जाऊ लागली. पुढे या चाचणीच्या पुन्हा १९३७, १९६०, १९७२ आणि १९८६ मध्ये सुधारित आवृत्त्या तयार करण्यात आल्या.
(४) वेश्लर यांनी बीनेच्या भाषिक बुद्धिमापन चाचण्या प्रौढ लोकांच्या बुद्धिमापनासाठी उपयुक्त नाहीत, असे मत मांडले. त्यांनी प्रौढांमधील आणि बालकांमधील भाषिक व अभाषिक क्षमतांचे मापन करण्यासाठी बुद्धिमापन चाचण्यांची मालिका विकसित केली.