baatmi lekhan in savitribai punyatithi in marathi
Answers
Explanation:
मुलींसाठी साक्षरतेची वाट प्रकाशमान करणाऱ्या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती मंगळवारी शहरासह जिल्ह्यातील विविध संघटनांच्या वतीने उत्साहात साजरी करण्यात आली. या निमित्ताने सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेची शहरातून वाजत-गाजत मिरवणूक, जनजागृतीपर व्याख्याने, सावित्रीबाई फुले यांना अभिवादन, असे विविध उपक्रम आयोजित करण्यात आले होते.
‘मुलगी वाचवा, देश वाचवा’, ‘बेटी है तो कल है’, ‘बेटी बचाओ’, असे विविध संदेश फलक हातामध्ये घेऊन ढोल-ताशांच्या गजरामध्ये सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेची शहरातून मिरवणूक काढण्यात आली. न्यू आर्टस् कॉलेजच्या प्रवेशद्वारावरुन सुरू झालेली ही मिरवणूक दिल्लीगेट, चौपाटी कारंजा, चितळे रोड, कापड बाजार, माणिक चौक, आशा टॉकीज रोडमार्गे माळिवाडा येथे आली. तेथे सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. क्रांतिज्योती सामाजिक प्रतिष्ठानच्या वतीन नंदनवन लॉन येथे सावित्रीबाई फुले यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. या वेळी मुलगी वाचवा देश वाचवा या अभियानांतर्गत नुकत्याच जन्मलेल्या मुलीच्या नावावर एक लाख रुपयांची ठेव पावती ठेऊन आई-वडिलांचा सत्कार करण्यात आला.
अहमदनगर जिल्हा मराठा विद्याप्रसारक समाजाच्या न्यू आर्टस् महाविद्यालयात क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यानिमित्त महाविद्यालयातील विद्यार्थिनींनी सावित्रीबाई फुले यांची वेशभूषा केली होती. तर, पुणे येथील सामाजिक कार्यकर्त्या किरण मोघे यांचे सावित्रीबाई फुले यांच्या कार्यावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. नेप्ती येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज अभियांत्रिकी महाविद्यालयमध्ये क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त महाविद्यालयातर्फे विविध क्षेत्रांत प्रावीण्य मिळविणाऱ्या विद्यार्थिनींचा सत्कार करण्यात आला. तसेच, विद्यार्थिनींसाठी सूचना व तक्रारपेटी बसविण्यात आली.
सारसनगर येथे दिवंगत दामोधर विधाते (मास्तर) विद्यालयाच्या वतीने सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त मिरवणूक काढण्यात आली. सावित्रीबाई फुले माध्यमिक विद्यालय येथे सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. अहमदनगर जिल्हा महिला काँग्रेस, नेप्ती येथील सावता परिषद, अहमदनगर शहर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस, महात्मा फुले चौकातील राऊ युवा प्रतिष्ठान, सम्राट अशोक चैत्यवन विकास मंडळ, जयंत युवा मल्टिपर्पज ऑर्गनायझेशन, ज्ञानदीप फाउंडेशन व गायत्री बहुउद्देशीय संस्था यांच्या वतीनेही क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांना अभिवादन करण्यात आले.