Baatmilekhan in marathi

Answers
Answer:
उपयोजित लेखनातील लेखन कौशल्य बातमी लेखन विदयार्थ्याच्या ज्या वेगवेगळ्या वाटा आहे,त्यापैकी ही एक वाट आहे. या क्षेत्रात तुम्ही स्वतःच वृत्तपत्र सुरू करू शकता वृत्तपत्र कार्यालयात विविध पदावर काम करू शकता. असा व्यापक दृष्टीकोन समोर ठेऊन या लेखन कौशल्याचा अभ्यास करणे अपेक्षित आहे.
बातमी लेखनाचे विविध पैलू समजून बातमी घेऊया.
(NEWS)
N – (North)
E – (East)
W – (West)
S – (South)
या प्रमाणे चारही दिशांनी म्हणजे चोहोंकडून चालू स्थितीची माहिती सामान्यातल्या सामान्य लोकांपर्यंत पोहोचविणे. एखादी घटना किंवा प्रसंग लोकांना कळावा म्हणून त्याची वर्तमानपत्रात प्रसिद्ध करण्याजोगी माहीती म्हणजे ‘बातमी’ परंतु प्रत्येक घटना बातमी होते, असे नाही.
उदा० कुत्रा माणसाला चावला ही घटना बातमी होऊ शकत नाही, पण माणूस कुत्र्याला चावला ही बातमी होऊ शकते.अर्थात बातमी होण्यासाठी त्या घटनेत काहीतरी वेगळेपण असावे लागते.
राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, करमणूक, व्यापारविषयक, औद्योगिक अशा विविध क्षेत्रातील घडामोडीवर बातमी लेखन केले जाते.
बातमी ही आजच्या युगात आपल्या जीवनातील एक अतिशय महत्त्वाचा घटक आहे. कारण जगामध्ये कोठे काय घडले ? हे आपल्याला बातमी द्वारे कळते. म्हणूनच वस्तूस्थितीचे चित्रण करणारी बातमी तयार करणे, बातमी लेखन करणे हे महत्त्वाचे कौशल्य ठरते. बातमी घडून गेलेल्या घटनांची, त्याचप्रमाणे घडणाऱ्या नियोजित कार्याची असते.बातमी मध्ये आपल्याला काय घडले? कधी घडले? कुठे घडले कोण कोण उपस्थित होते? इत्यादी प्रश्नांची उत्तरे मिळतात ती म्हणजे बातमी. बातमी लेखना मध्ये जसे घडले तसे यथातथ्य वर्णन करायला हवे.
शालेय स्तरावर साजरे झालेले कार्यक्रम, राबविलेले उपक्रम, उदा. विविध दिन, ( मराठी भाषा दिन, वाचन प्रेरणा दिन…) स्नेहसंमेलन, वृक्षारोपण, सहल, विविध स्पर्धा वगैरे इ. माहिती देऊन बातमीलेखन विचारले जाते.
Explanation: