India Languages, asked by lucky1543, 11 months ago

Batmi lekhan of sports day in marathi

Answers

Answered by Hansika4871
35

" संस्कार भारती विद्यालयात क्रीडा स्पर्धा संपन्न "

अंधेरी, १३ जानेवारी २०२०:

अंधेरीच्या संस्कार भारती विद्यालयात 12 जानेवारी 2020 रोजी क्रीडा स्पर्धा, क्रीडा संकुलामध्ये संपन्न झाली. या स्पर्धेसाठी मुले तीन महिन्यांपासून तयारी करत होते. स्पर्धेची सुरुवात मार्च पास्ट तसेच मशाल पेटवून झाली. ही क्रीडा स्पर्धा सलग दोन दिवसांसाठी चालली. इयत्ता पहिली ते पाचवी, सहावी ते आठवी आणि नववी ते दहावी असे तीन गट बनवण्यात आले होते. क्रिकेट, फुटबॉल, गोळा फेक, भालाफेक, बास्केट बॉल, टेनिस, मॅरेथॉन, रिले हे खेळ खेळण्यात आले. तसेच पारंपारिक खेळ असे की कबड्डी, खोखो ह्यात देखील मुलांची संख्या दिसून आली.

मुलांच्या खाण्यापिण्याची व्यवस्था देखील शाळेने नीट प्रकारे केली होती. स्पर्धेचा निकाल तिसऱ्या दिवशी ऑडिटोरियम मध्ये सांगण्यात आला. मुलांना यांच्या चेहऱ्यावर खूप आनंद दिसून येत होता. तसेच या स्पर्धेची सांगता माननीय अध्यक्ष महोदय ह्यांनी आपल्या भाशनादवारे केली.

Similar questions