batmi lekhan on measles rubella rasikaran
Answers
here is ur answer...........
Answer: जनसत्ता | जुलै २५, २०१९
प्रत्येक पालकाला आपल्या मुलाच्या आरोग्यासाठी सर्वतोपरी काळजी घ्यायची असते. मूल आजारी पडू नये, यासाठी ते काहीही करायला तयार असतात. मुलांच्या निरोगी आयुष्यासाठी लहानपणी होणाऱ्या आजारांवरील लसीकरण अत्यंत महत्त्वाचे असते. लसीकरण हा सार्वजनिक आरोग्यक्षेत्रातील सर्वात स्वस्त उपाय आहे. कारण लसीकरणामुळे संभाव्य व्यंग व मृत्यू यांना थेट व परिणामकारक प्रतिबंध करता येऊ शकतो. गेल्या पाच दशकात पाच वर्षांखालील मुलांच्या मृत्यूचा दर २३३ वरून ६३ (दर हजार मुलांमागे) इतका खाली येण्यासाठी लसीकरण हा महत्त्वाचा घटक आहे.
काही आजारांना लहानपणी देण्यात येणाऱ्या लसींनी प्रतिबंध करता येतो. यात डिप्थेरिया, धनुर्वात, डांग्या खोकला, गोवर, गालगुंड, रुबेला, हेपटायटिस ए, हेपटायटिस बी, एच इन्फ्लुएन्झा बी, न्यूमोकोकल डिसीज, कांजिण्या, रोटाव्हायरल डायरिया, पोलिओ, विषमज्वर इन्फ्ल्यूएन्झा आणि काही मर्यादेपर्यंत क्षयरोगाला प्रतिबंध करता येऊ शकतो. यापैकी क्षयरोग (बीसीजी), डिप्थेरिया, डांग्या खोकला, धनुर्वात (डीपीटी), एच इन्फ्ल्यूएन्झा बी (एचआयबी), हेपटायटिस बी, गोवर, गालगुंड, रुबेला (एमएमआर) आणि पोलिओच्या लसी राष्ट्रीय लसीकरण कार्यक्रमांतर्गत सरकारी आरोग्यसेवा केंद्रांमध्ये उपलब्ध असतात.
मुलांचे लसीकरण कशाप्रकारे व्हायला हवे, याचे वेळापत्रक इंडियन असोसिएशन ऑफ पिडिऑट्रिशिअनने (आयएपी) उपलब्ध करून दिले आहे.
मुलांना लस देण्यास घेऊन जाताना पूर्वीचे अहवाल घेऊन जावेत.
Explanation: