Social Sciences, asked by bharti10kalsariya, 4 months ago

beroj gare ek samsya essay in marathi​

Answers

Answered by pratikkumavat2110
3

बेरोजगारी एक समस्या

सध्या आपल्या देशात बेकारीच्या राक्षसाने अक्षरश थैमान घातले आहे. गिरण्या कारखाने धडाधड बंद पडले आहेत. उद्योग व्यवसाय चे प्रमाण कमी होत आहे. शिक्षण घेऊन तयार असलेल्या लोकांना नाहीत; त्यात कारखाने बंद पडल्यामुळे बेकार झालेल्यांचे आणखीन भर ! एका बाजूला महागाई आकाशाला भिडत आहे आणि त्याच वेळी घरात येणारे उत्पन्न बंद अशा विलक्षण कात्रीत लोक सापडले आहेत. कित्येकजण निराशेच्या गर्तेत सापडून व्यसनाच्या आहारी जात आहेत. महापालिकेच्या कचऱ्याच्या गाडीवर बी ए ,एम ए झालेले तरुण दिसू लागले आहेत. कितीजण आत्महत्या करतात; तर काही जण स्वतःच्या बायका-मुलांसह स्वतःला जाळून घेतात. चोऱ्या दरोडे यांच्यात वाढ झाली. विकास झालेले तरुण गुन्हेगारीकडे वळत आहेत. एकंदरीत समाजाच्या अस्तित्वाच्या मुळावरच घाला आहे. सामाजिक अस्थिरता धोक्यात येत आहे. बेकारी नष्ट केली नाही तर, अवघा समाजच नष्ट होणार आहे.

बेकारीच्या मुळाशी सतत वाढणारी लोकसंख्या आहेत सतत महत्त्वाचे कारण आहे. आधीच औद्योगिक मंदी आहे. त्यात सतत वाढत्या लोकसंख्येला नोकरी पुरवणे अशक्य आहे. तसेच, उद्योग जगतात नवीन बदलाचे वारे वाहतात. जुने उद्योग मोडून पडतात. आणखीन माणसे बेकार होतात. काळ बदलतो, लोकांच्या आवडीनिवडी बदलतात. त्यांची जीवनशैली बदलते. त्यामुळे आधीच जीवनशैलीला अनुरूप असलेले उद्योगधंदे बंद पडतात. आणखी एक मोठे जबरदस्त कारण म्हणजे यांत्रिकीकरण. यंत्रे माणसाचे काम करतात. त्यामुळे देखाव्यात भर पडते. आपल्या देशात बहुसंख्य लोकांचे पोट शेतीवर अवलंबून आहे. पण आपण अजूनही पारंपारिक पद्धतीने शेती करतो. ते पूर्णता निसर्गावर अवलंबून आहे. अपुरे उत्पन्न, तेही निसर्गाच्या लहरीपणावर अवलंबून असते. त्यामुळे शेतीवरील माणसेही बेकारीच्या झुंडीत सामील होत आहे. लोक मोठ्या आशेने शहराकडे धाव घेतात आणि अक्षरशः बकाल जीवन जातात. बेकारीमुळे अशा प्रकारे मानवी संपत्तीचा अक्षरशः क्षय होत आहे, खंगत चाललेल्या लोकांकडून देशाची प्रगती होणे केवळ अशक्यच आहे; शिवाय ज्या प्राचीन, उच्च, उदांत संस्कृतीचा अभिमान बाळगतो, ती खंगत जाणाऱ्या समाजाबरोबरच नष्ट होणार आहे.

Hope this helps you.

Answered by swap2901
1
Daily is the answer check the link
Similar questions