History, asked by kopsahooruddy, 1 year ago

Berojgari essay in Marathi

Answers

Answered by priyaro
62
बेरोजगारी ही आपल्या देशातील एक मोठी समस्या आहे. कित्येक सुशिक्षित तरुणांना नोकरी मिळत नाही. कधी कधी असे तरुण वाम मार्गाने पैसे मिळवण्या कडे सुद्धा वळतात.बेरोजगारी ही अशिक्षित वर्गामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणावर दिसून येते. बेरोजगारी मुळे गुन्हेगारी सुद्धा वाढते आहे. बेरोजगारी ची अनेक कारणे आहेत. काही कारणं म्हणजे झटपट पैसे मिळवण्याची प्रवृत्ती, ज्याचा मुळे कमी मानधन असलेले काम करायला लोक तयार नसतात. अजून एक कारण म्हणजे योग्य अशा प्रशिक्षणाचा अभाव. ज्याच्यामुळे बऱ्याच व्यवसायात लोकांची गरज असूनही जागा भरत नाहीत.आपल्या सरकारने बेरोजगारी हटवण्यासाठी बरेच उपक्रम चालू केले आहेत. स्टार्टअप्सला सरकार कडून वेगवेगळ्या पद्धतीने बरीच मदत आणि प्रोत्साहन मिळत आहे. अशा प्रकारे नवीन उद्योगांना चालना मिळते आहे. अर्थातच नवीन उद्योग चालू झाले तर ते अनेक लोकांना रोजगार देऊ शकतील,तसेच बऱ्याच अशासकीय संस्था (NGO ) सुद्धा युवकांना प्रशिक्षण देण्यासाठी पुढे येत आहेत. जेणेकरून ह्या युवकांना नोकऱ्या मिळू शकतील,

priyaro: you may expand on the above lines
Similar questions