India Languages, asked by pawarsatyawan1997, 4 months ago

भांडवल संरचणेवर परिणाम करणारे घटक​

Answers

Answered by nandha2401
0

Explanation:

आपल्या संग्रही ह्या ना त्या स्वरूपात धन राखणाऱ्या व्यक्तीकडील पैसा घेऊन आर्थिक उत्पादनासाठी, धनाची गरज असणाऱ्या व्यक्तीस ते धन मिळवून देणारी यंत्रणा. समाजतील निरनिराळ्या व्यक्तींजवळ असलेली शिल्लक या बाजारातील व्यवहारांमुळे कारखाने, उद्योगकेंद्रे, घरबांधणी, यंत्रजोडणी व यंत्रनिर्मिती, कच्चा मालाची खरेदी व साठवण ह्या अगर इतर धननिर्मिती, करणाऱ्या व्यवसायांसाठी उपयोगात आणली जाते.

बाजाराचे घटक

भांडवलाची देवघेव करणाऱ्या ज्या संस्था भांडवल बाजारात असतात, त्यांत प्रामुख्याने बँका, पतपेढया, व्यापारी पेढया, विमा कंपन्या, शेअर बाजार, युनिट ट्रस्ट, गुंतवणूक न्यास इत्यादींचा समावेश होतो. त्यांच्या जोडीला इतरही अनेक भांडवली देवघेव करणाऱ्या व्यक्ती आणि संस्था असतात. भारतात भांडवली देवघेव करण्याचे काम

१) भारतीय उद्योगवित्त निगम,

२) विविध राज्य वित्त निगम,

३) राष्ट्रीय औद्योगिक विकास निगम,

४) भारतीय औद्योगिक कर्ज व विनियोग निगम,

५) भारतीय आयुर्विमा निगम,

६) भारतीय औद्योगिक विकास बँक,

७) भारतीय युनिट ट्रस्ट,

८) व्यापारी बँका व पतपेढया,

९) राष्ट्रीय लघुउद्योग निगम,

१०) औद्योगिक पुनर्वित निगम व

११) शेअरबाजार

या वित्तसंस्थांमार्फत पार पाडण्यात येते. देशातील उद्योगधंद्यांना भांडवल पुरविणाऱ्या ह्या संस्थांशिवाय खाजगी रीत्या (कंपन्या आणि सावकार) ठेवण्यात येणाऱ्या व्यक्तिगत ठेवी याही भांडवलाची बरीच गरज भागवीत असतात.

देशाच्या आर्थिक विकासचक्रात भांडवली देवघेव करणाऱ्या संस्था महत्वपूर्ण कामे पार पाडीत असतात. त्यांपैकी

१) शिल्लक वाढण्यासाठी उत्तेजन देणे व ह्या शिलकीची योग्य पद्धतीने गुंतवणूक करण्यासाठी मार्गदर्शन करणे आणि

(२) भांडवलाची मागणी करण्यासाठी अहमहमिकेने पुढे येणाऱ्या गरजू उद्योजकांमध्ये ह्या भांडवलाचे परिणामकारी वाटप करणे, ही मुख्य कामे मानली जातात.

देशातील शिलकीचा उगम त्या राष्ट्राच्या राष्ट्रीय उत्पन्नातून होत असला, तरी भांडवल गुंतविण्यासाठी काही प्रलोभने व हमी उपलब्ध असल्यास त्यांचा उपयोग ठराविक राष्ट्रीय उत्पन्नाच्या विभागांतील लोकांमध्ये शिल्लक टाकण्याची प्रवृत्ती व प्रमाण वाढविण्यासाठी खात्रीने होत असतो. भांडवल गुंतविण्यासाठी प्रलोभने व हमी देण्याचे काम भांडवल बाजार पार पाडीत असतो. या बाजारात भांडवल गुंतविण्यासाठी निरनिराळे पर्याय उपलब्ध असतात. या बाजारामुळे भांडवल खेळते राहून भांडवलास हमखास गिऱ्हाईकही लाभते. जुने व नवे कर्जरोखे, बचतरोखे, अधिकोष देयके, कमी किंवा दीर्घ मुदतीची सरकारी बंधपत्रे यांच्या रूपाने भांडवल गुंतविण्याचे अनेक मार्ग या बाजारात उपलब्ध असतात.

Similar questions