Art, asked by pushkarshelar01, 8 months ago

भांडवलशाही बाजारपेठीय अर्थव्यवस्था ही संकल्पना कोणत्या देशाच्या संदर्भात वापरली जाते answer this question ​

Answers

Answered by yadavamardeep661
6

Answer:

भांडवलशाही अर्थव्यवस्था ही संकल्पना कोणत्या देशाच्या संदर्भात आहे

Answered by chamilmajumder
1

Answer:

भांडवलशाही : ज्या अर्थव्यवस्थेत उत्पादनाची सूत्रे खाजगी भांडवलदारांच्या हातात असतात, ती अर्थव्यवस्था 'भांडवलशाही अर्थव्यवस्था' म्हणून ओळखली जाते. देशकालपरत्वे या अर्थव्यवस्थेच्या स्वरूपात काही फरक आढळून येतात. तात्विक दृष्टया ज्या अर्थव्यवस्थेचे निखळ भांडवलशाही असे वर्णन करता येईल, अशा स्वरूपाची भांडवलशाही अर्थव्यवस्था आज जी विशेषत्वाने भांडवलशाही राष्ट्रे म्हणून ओळखली जातात, अशा अमेरिकेची संयुक्त संस्थाने किंवा पश्चिम जर्मनी यांसारख्या राष्ट्रांतूनही अस्तितिवात आहे, असे म्हणता येणार नाही. परंतु भांडवलशाहीचे आजचे स्वरूप समजून घेण्यापूर्वी तिचे मूळ स्वरूप व तिची गत इतिहासकालातील वाटचाल यांचा आधी विचार केला पाहिजे.

Explanation:

औद्योगिक भांडवलशाहीचा उदय इंग्लंडमध्ये अठराव्या शतकाच्या अखेरीस झाला. यापूर्वीचा यूरोपच्या इतिहासातील सु. चार शतकांचा कालखंड हा 'व्यापारी भांडवलशाही'चा (मर्चंट कॅपिटॅलिझम) कालखंड म्हणून ओळखला जात असला, तरी या कालखंडात विविध कारणांनी झालेल्या व्यापार विकासामुळे व्यापारी वर्गाच्या हातात संचित झालेले धन, एवढेच या कालखंडाचे प्रमुख वैशिष्टय होते. व्यापाराच्या विस्ताराबरोबरच वस्तूंचा पुरवठा वाढविण्याची गरज भासू लागली होती. ही गरजच पुढे शोधांची जननी ठरली आणि अठराव्या शतकाच्या उत्तरार्धात इंग्लंडमध्ये अनेक यंत्रांचा शोध लागला. याहूनही महत्त्वाची गोष्ट म्हणजे या शोधामुळे नवनवीन तंत्रज्ञान आत्मसात्‌ करून उत्पादनाचे प्रश्न सोडविता येतात, असा आत्मविश्वास मानवाच्या ठिकाणी प्रथम इंग्लंडमध्ये व नंतर क्रमाक्रमाने प्रगत होत गेलेल्या इतर राष्ट्रांमध्ये निर्माण झाला. यांत्रिक उत्पादनाचे तंत्र हस्तगत झाल्यानंतर मानव त्याच्याकडे पाठ फिरवील, ही गोष्ट शक्य नव्हती.

Similar questions