भौगोलिक ज्ञानाचे उपयोजन करून प्रदेशाचा अभ्यास केल्यास कोणते फायदे होतात
Answers
Answer:
तेथील निसर्ग अभ्यास होतो
Answer:
कोणत्याही प्रदेशाचा अभ्यास करत असताना आपल्याला भौगोलिक ज्ञान असणे गरजेचे असते. एखाद्या प्रदेशाची मूल्यमापन करत असताना तो प्रदेश कोणत्या पट्ट्यात येतो? किंवा त्या प्रदेशाची रचना कशा प्रकारचे आहे?तसेच त्या प्रदेशातील माती कोणत्या प्रकारची आहे? ती माती त्या प्रकारची असण्याचे कारणे काय? त्या प्रदेशात पाण्याचे प्रमाण किती आहे? व ते असण्याचे कारण काय? अशा अनेक प्रश्नांचे उत्तर देण्यासाठी भौगोलिक ज्ञान असणे गरजेचे असते.
कोणत्याही प्रदेशाचे मूल्यमापन करत असताना योग्य व अचूक मूल्यमापन करण्यासाठी मूल्यमापन करणार्या व्यक्तीस भौगोलिक ज्ञान असणे गरजेचे असते. कोणत्याही प्रदेशात बाबत योग्य तो निर्णय घेण्यासाठी भौगोलिक ज्ञानाचा फायदा होतो व त्यामुळे नुकसान होत नाही.
भौगोलिक परिस्थितीनुसार कुठला व्यवसाय करावा किंवा कोणता व्यवसाय करू नये याची माहिती देखील त्या प्रदेशाच्या भौगोलिक अभ्यास वरूनच कळते.