Geography, asked by Anonymous, 4 months ago

भौगोलिक कारणे लिहा.

1.पृथ्वीवर दिवस पॅसिफिक महासागरात सुरू होतो.

Answers

Answered by jhas75070
5

Answer:

पॅसिफिक महासागर : पृथ्वीवरील सर्वांत मोठा महासागर, क्षेत्रफळ १६,६०,००,००० चौ. किमी. सभोवतालचे समुद्र मिळून एकूण क्षेत्रफळ १७,९६,७९,००० चौ. किमी. असून ते जगाच्या क्षेत्रफळाच्या जवळजवळ निम्मे भरते. याच्या पश्चिमेस आशिया खंड, पूर्वेस उत्तर आणि दक्षिण अमेरिका ही दोन खंडे, उत्तरेस बेरिंगची सामुद्रधुनी व दक्षिणेस अंटार्क्टिका खंड आहे. अटलांटिक व पॅसिफिक यांमधील सीमा केप हॉर्नवरून दक्षिणेस सरळ रेषेने समजली जाते, तर पॅसिफिक व हिंदी महासागर यांतील सीमा मलाया, सुमात्रा, जावा, तिमोर, ऑस्ट्रेलिया (केप लंडनडेरी) व टास्मानिया यांच्या पूर्व किनाऱ्याने व दक्षिणेस १४७° पू. रेखावृत्ताने ठरविली आहे. महासागराचा आकार स्थूलमानाने त्रिकोणाकृती असून शिरोबिंदू उत्तरेस बेरिंग सामुद्रधुनीजवळ आहे. या त्रिकोणाचा पाया बराचसा दक्षिणेस असला तरी त्याची कमाल रुंदी विषुववृत्तावर आढळते. बेरिंग सामुद्रधुनी ते केप अडॅरपर्यंतच्या (अंटार्क्टिका खंड) या महासागराची दक्षिणोत्तर लांबी सु. १६,०९३ किमी.असून त्याची विषुववृत्तावरील रुंदी १७,००० किमी. पेक्षा अधिक आहे. या महासागराची खोली ४,२६७ मी. असून पाण्याचे आकारमान ७२·३७ कोटी घ. मी. आहे. पॅसिफिकच्या किनाऱ्यांवर पर्वतराजी असल्याने त्यात केवळ १∕७ जलवहन होते.

पॅसिफिकला जोडून खंडांच्या किनाऱ्यांना अनुगामी असे अनेक अरुंद समुद्र आहेत. हे समुद्र बव्हंशी याच्या पश्चिम भागात आढळतात. महत्त्वाच्या समुद्रांत बेरिंग, अल्यूशन, ओखोट्स्क, सेलेबीझ, जपानी समुद्र, पीत समुद्र, पूर्व आणि दक्षिण चिनी समुद्र, बांदा समुद्र यांचा समावेश होतो.पीत समुद्र सोडल्यास इतर सर्व समुद्रांची खोली १,५०० फॅदमपेक्षा जास्त आहे. या महासागराच्या पूर्व भागातील समुद्रांत प्रामुख्याने कॅलिफोर्नियाचे आखात आणि ब्रिटिश कोलंबियाचा समुद्र याचा समावेश होतो.

निर्मिती : या महासागराच्या निर्मितीचा इतिहास अजूनही वादग्रस्त आहे. पृथ्वीला आजची घनस्थिती प्राप्त होण्यापूर्वी तिच्या काही भागांतील द्रव्य बाहेर पडून तेथे खळगा तयार झाला पुढे त्या खळग्यात पाणी साचून हा महासागर निर्माण झाला आणि पृथ्वीपासून बाहेर पडलेले द्रव्य गोठून चंद्राची निर्मिती झाली. ही कल्पना जॉर्ज डार्विन यांनी मांडली होती, पण या सर्व कल्पना केव्हाच (१९५०) त्याज्य ठरविण्यात आल्या आहेत.

पॅसिफिकच्या निर्मितीविषयीच्या कल्पना पुढीलप्रमाणे व्यक्त करण्यात येतात : (१) खंडे आणि सागरतळ यांची संरचना अगदी विभिन्न असून, समुद्रतळाची घनता जमिनीपेक्षा जास्त आहे. पृथ्वीचे हे दोन घटक भूशास्त्रीय काळाच्या अगदी प्रारंभापासून आजपर्यंत आहेत त्या ठिकाणी स्थिर राहिले आहेत. त्यांची स्थिती शाश्वत आहे तीत फारसा बदल झालेला नाही.

(२) अगदी सुरुवातीस फक्त दोनच खंडे होती आणि ती जलमग्न होती. कालांतराने ती समुद्रसपाटीवर उचलली जाऊन त्यांच्यापासून आजची भूखंडे तयार झाली. हिल ह्याचा खंड-निर्मितीचा सिद्धांत या कल्पनेवर आधारलेला आहे.

(३) तिसरी प्रमुख कल्पना म्हणजे वॅगनरचा खंडविप्लव सिद्धांत होय. या सिद्धांताप्रमाणे अगदी प्रारंभी एक मोठे खंड –पॅनजिआ– होते. ते भंग पावून त्यापासून लॉरेंशिया आणि गोंडवनभूमी ही महाद्वीपे निर्माण झाली. पुढे सु. २५ ते ३० कोटी वर्षांपूर्वी ही दोन महाद्वीपे भंग पावून जेव्हा एकमेकांपासून दूर सरकत गेली, तेव्हा महासागरांच्या निर्मितीस प्रारंभ झाला. पॅसिफिक महासागराच्या पूर्व भागात जो सागरतळ पठाराचा भाग आहे, त्यात चाललेल्या भूभौतिक संशोधनावरून असे स्पष्ट झाले आहे की, खंडांच्या एकमेकांपासून दूर सरकण्याच्या हालचाली अजूनही चालू आहेत. या हालचालींमुळे सागरतळाशी लांब, चिंचोळ्या गर्ता (खोलवा) आणि विस्तृत विदारण विभंग निर्माण झालेले आहेत. या गर्ता व कातरभ्रंश प्रामुख्याने अमेरिकेची दोन खंडे आणि आशियाचा आग्नेय भाग यांच्या किनाऱ्यांजवळ तसेच न्यूझीलंड व टाँगा-सामोआ द्वीपसमूह यांना जोडणाऱ्या रेषेजवळ दिसून येतात.

Explanation:

mark me as brainlist because It was very difficult to search your answer

Answered by BRAINLYBOT1020
18

उत्तर:

भूभागावरील एखाद्या ठिकाणी दिवसाची सुरुवात झाली, तर त्या ठिकाणच्या पूर्वेकडे व पश्चिमेकडे कोणता दिवस धरायचा यावरून गोंधळ झाला असता, असे होऊ नये म्हणून विशाल पॅसिफिक महासागरावरून जाणार्या १८०° रेखावृत्ताला अनुसरून आखलेल्या आंतरराष्ट्रीय वाररेषेवर पृथ्वीवरील दिवस सुरु होतो व संपतो. याचाच अर्थ पृथ्वीवरील नवीन दिवस पॅसिफिक महासागरात सुरू होतो.

Similar questions