भागीदारी म्हणजे काय भागीदारीचे प्रकार सांगा
Answers
Explanation:
भागीदारी
कोणत्याही किफायतशीर व्यापार उद्योग करण्यासाठी जेव्हा दोन किंवा अधिक व्यक्ति एकत्र येऊन आपली संपत्ती, अंगमेहनत अगर कसब एकत्र करून त्या व्यापार उद्योगात होणारा नफा मान्य प्रमाणात वाटून घेण्याचा करार करतात, तेव्हा कायद्याच्या परिभाषेत अशा व्यक्तींमधील संबंधास भागीदारी असे म्हणतात. भागीदारीच्या सर्व भागीदारांना संयुक्तपणे फर्म, व्यवसाय-संघ किंवा भागीदारी पेढी या नावांनी आणि व्यक्तिशः भागीदार असे संबोधतात. भागीदारासंबंधीच्या कायदेशीर तरतुदी भारतीय भागीदारी अधिनियम (१९३२) मध्ये नमूद केलेल्या आहेत. तथापि हा अधिनियम होण्यापूर्वी भारतीय करार अधिनियम (१८७२) मधील अकराव्या भागातील तरतुदींनुसार भागीदारीची अंमलबजावणी होत होती. अज्ञान व्यक्तिस भागीदारी पेढीचा सभासद (भागीदार) होता येत नाही. परंतु भागीदारीचा फायदा मिळण्यासाठी त्यास सामील करून घेता येते. भागीदारंचे कोणत्याही प्रकारचे नुकसान झाल्यास अशी अंज्ञान व्यक्ती त्या नुकसानीस व्यक्तिशः जबाबदार असत नाही. परंतु अशा अज्ञान व्यक्तिचा भागीदारी पेढीतील नफ्याचा आणि मालमत्तेचा हिस्सा भागीदारी पेढीचे नुकसान, कर्जे व देणी फेडण्यास जबाबदार राहतो. कोणत्याही एका भागीदाराच्या निष्काळजीमुळे अगर लबाडीने त्रयस्थ इसमाचे नुकसान झाल्यास त्यानुकसानीची जबाबदारी सर्व भागीदारांवर सामुदायिक रीत्या व स्वतंत्र रीत्या येते. कारण प्रत्येक भागीदार हा इतर भागीदारांचा व पेढीचा प्रतिनिधी असतो. त्यामुळे कोणत्याही भागीदाराने केलेल्या व्यवहाराची बरीवाईट सर्व जबाबदारी सर्व भागीदारांवर तसेच भागीदारीवर येते.
follow kar mala .
Answer:
please post 1 more question
Explanation:
deshmukhvarsha