भूकंप प्रवण क्षेत्र चा नकाशा पहा राजकीय नकाशा घ्या आणि त्या नकाशावर भूकंप प्रवण क्षेत्र काढा आणी स्पष्टपने वेगवेगळया क्षेत्रांची मांडणी करा
Answers
Answer:
भारत इंडोऑस्ट्रेलियन भूपट्टाच्या उत्तर पश्चिम दिशेला असून तो ऑस्ट्रेलिया, हिंदी महासागराचा मोठा भाग आणि इतर काही लहान देशांनी वेढलेला आहे. हे भूपट्ट अवाढव्य अशा युरेशियन भूपट्टावर आदळत असून या भूपट्टाच्या खाली सरकत आहे (आकृती १).
Explanation:
एक भूपट्ट दुसऱ्या भूपट्टाखाली अशा पद्धतीने सरकण्याच्या या प्रक्रियेला अधोगमन (Subduction) असे म्हणतात. हे भूपट्ट एकमेकांवर आदळण्यापूर्वी टेथिस नावाच्या समुद्रामुळे हे भूपट्ट दोन तुकड्यांत विभागले गेले होते. पृथ्वीच्या शिलावरणाचा काही पृष्ठभाग महासागरांनी व्यापलेला असून उरलेला भाग हा खंडांनी व्यापलेला आहे. महासागरांच्या खालच्या भूपट्टांमध्ये ते अधिक खोलीवर असल्याने त्यांच्यामध्ये दुसऱ्या भूपट्टाविरूद्ध अभिसरण घडण्याची प्रक्रिया अधिक प्रमाणावर घडते. याउलट, खंड शिलावरणाजवळ असून अधिक तरणशील असल्याने त्यांची पृथ्वीच्या पृष्ठभागाजवळ राहण्याची शक्यता वाढते. जेव्हा दोन खंड अभिसारित होतात, तेव्हा ते मोठ्या प्रमाणावर संकुचित आणि घट्टसर होत जातात. यालाच संकुचन (Shortening) आणि सांदीभवन (Thickening) असे म्हणतात. याचे उत्तम उदाहरण म्हणजे हिमालय पर्वत आणि तिबेटचा भाग.