भूकवचातील स्तरित खडकावर बले जेंव्हा एकमेकांच्या दिशेने कार्य करतात तेव्हा कोणता पर्वत निर्माण होतो?
Answers
Answer:
रूपांतरित खडक : भूकवचात प्रामुख्याने तीन प्रकारचे खडक आढळतात, ते म्हणजे प्राथमिक किंवा अग्निज खडक, द्वितीयक किंवा गाळाचे खडक आणि रूपांतरित खडक. अग्निज व गाळाचे हे दोन्ही प्रकारचे खडक भूकवचाच्या हालचालींनी खोलवर दडपले जातात काही जागी त्यांच्यात शिलारसाचे अंतर्वेशन (घुसण्याची क्रिया) होऊन ते तापवले जातात. मूळच्या खडकांवर अशा प्रकारे दाब व उष्णता यांचा वेगवेगळा किंवा एकत्रित परिणाम होऊन त्यांच्या खनिज संघटनात व संरचनांमध्ये बदल होतो आणि त्यांचे रूप पालटते. मूळचे रूप अंशतः किंवा समूळ पालटलेल्या अशा खडकांना रूपांतरित खडक म्हणतात.
संख्यात्मक दृष्ट्या भूकवचातील खडकांत अग्निज किंवा गाळाच्या खडकांपेक्षा रूपांतरित खडकांचे प्रमाण सर्वांत जास्त आढळते. विशेषतः भूखंडांच्या कवचातील खडकांत रूपांतरित खडक हा सर्वांत महत्त्वाचा प्रकार आहे. रूपांतरित खडकांपैकी बरेच खडक मुळात स्तरित गाळांचे खडक असून दाब व उष्णता यांच्या परिणामाने त्यांना सध्याचे रूप प्राप्त झाले असावे, हे मत सर्वप्रथम जेम्स हटन यांनी मांडले. चार्ल्स लायेल यांनी प्रिन्सिपल्स ऑफ जिऑलॉजी (१८३३) या पुस्तकात त्याचा पुनरुच्चार केला. या खडकांना ‘बदललेल्या रूपाचे’ या अर्थी ‘मेटमॉर्फिक’ ही संज्ञाही त्यांनीच सुचविली.
वाढते तापमान, दाब व बदलती रासायनिक परिस्थिती या प्रकारच्या भौतिक व रासायनिक बाह्य परिस्थितीत बदल झाल्यामुळे खडकातील खनिजांचा भौतिक-रासायनिक समतोल बिघडतो. अशा परिस्थितीत घनावस्थेतील खडाकांच्या खनिज घटकांत व त्यांच्या संरचनांत फेरबदल घडवून नव्या परिस्थितीशी जुळवून घेण्याच्या व पुन्हा समतोल स्थापन करण्याच्या करण्याच्या प्रयत्नांतून रूपांतरण घडून येते.
रूपांतरणाच्या प्रक्रिया निसर्गात प्रत्यक्षात चालू असताना पाहण्यास मिळत नाही अथवा करणेही शक्य होत नाही. त्यामुळे निसर्गात उघड्या पडलेल्या खडकांमध्ये बदल न पावलेल्या गाळांच्या खडकांपासून तो क्रमाक्रमाने वाढत्या प्रमाणावर बदल होत जाऊन शेवटी स्वरूप पूर्ण पालटलेल्या अवस्थेपर्यंतच्या खडकांचा अभ्यास करून त्यावरूनच रूपांतरणाची यंत्रणा व गति-उष्णीय प्रक्रिया (यासंबंधी माहिती पुढे दिली आहे) यासंबंधीचे निष्कर्ष काढावे लागतात.
भूकवचाच्या ज्या उथळ थरात वातावरणप्रक्रिया व संधानीकरण (घट्ट जोडले जाण्याची क्रिया) घडून येते त्यापेक्षा अधिक खोल थरात रूपांतरणाची क्रिया घडते. संधानीकरण व वातावरणक्रिया सामान्य तापमान व दाबाच्या परिस्थितीत घडून येत असल्यामुळे त्यांचा अंतर्भाव रूपांतरणात करीत नाहीत. रूपांतरणाची वरची सीमा म्हणजे उष्णतेने खडक वितळून लागून त्यांचा शिलारस तयार होणे पण याही परिस्थितीत मूळच्या खडकांतील काही ओळखीच्या खुणा नष्ट न होता शिल्लक राहिल्या असतील, तर या क्रियेचा अंतर्भाव अत्युच्च रूपांतरणात केला जातो. रूपांतराच्या बहुतेक प्रकारांत मूळच्या खडकांच्या घटक खनिजांचे अंशतः किंवा संपूर्ण पुनर्स्फटिकीभवन होते आणि त्यांच्या नवीन संरचना तयार होतात परंतु पुनर्स्फटिकीभवन न होता दिष्टदमनामुळे (एका दिशेने पडलेल्या दाबामुळे) खडकांचे केवळ भरडून चूर्ण होणे, या क्रियेचाही समावेश रूपांतरणात करतात.