बहिणाबाईंच्या काव्यरचनेला प्र.के.अत्रे यांनी दिलेली उपमा- *use
Answers
अपमान upaman cha translate
Explanation:
बहिणाबाई चौधरी यांच्या निवडक तीन कवितांचा रसिकतेने आस्वाद घेऊ व त्याचे मूल्यमापन करू. या कविता अभ्यासल्यानंतर तुम्हाला;
- अहिराणी या लोकभाषेतील कवितेची ओळख होईल.
- साध्या लोकभाषेत, प्रादेशिक बोलीतून मानवी जीवनाचे तत्त्वज्ञान कसे अविष्कृत होते हे कळेल.
- बहिणाबाईंच्या कवितेतून कौटुंबिक भावनाविष्कार, मानवी मनाची चपळता व मानवी क्षणभंगुरता समजेल.
- बहिणाबाईंच्या कवितेवर मौखिक परंपरेचा प्रभाव आहे हे लक्षात येईल.
- बहिणाबाईंच्या कवितेतून स्त्रीजीवनाचा सहज आविष्कार कसा घडतो ते समजेल.
- मानवी मनाची चपलता लक्षात येईल.
स्वातंत्य्यूर्व कालखंडात महात्मा फुले यांच्यानंतर ग्रामीण जीवनानुभूतीवर शेतकच्याच्या सुखदुःखावर फारसे काही लिहिले गेले नाही. कवी 'ग. ल. ठोकळ', ग. ह. पाटील, ही मंडळी ग्रामीण भागातून आली होती. परंतु त्यांच्यावर त्या काळातील रविकिरण मंडळाचा फार मोठा प्रभाव होता. त्यामुळे आपले ग्रामीण जीवन त्यांना वास्तव स्वरूपात रेखाटता आले नाही. शेतकर्यांच्या दु:खापेक्षा त्यांच्या सुखासीन जीवनाचे ते वर्णन करीत राहीले. खेड्यातील ग्रामव्यवस्था, कृषिजीवन 'पार आणि शिवार' खेड्यातील रितीभाती, सण उत्सव, अंधश्रद्धा, त्यांचे भोळेभाबडे मन, बहिणाबाईंच्या कवितेतून भरभरून वाहत राहिले. ग्रामीण संवेदनशीलता निरक्षर बहिणाबाईंना नेमकेपणाने शब्दात पकडता आली. बहिणाबाईच्या कवितेत पाऊस पाणी, काळी माती, निसर्ग डोंगर दन्या, झाडं झुडपं याला टक्कर देणारी, खेड्यातील माय माऊली येते. तिचे भावविश्व, तिचे मन, तिचं जगणं मरणं येते ते खानदेशी अहिराणी लोकभाषेत. लोकगीतांच्या लयीत येणारी त्यांची कविता ग्रामीण माणसांच्या मनाची सहज पकड घेते. बहिणाबाईंवर लोकसाहित्य, संतसाहित्यांचा फार मोठा प्रभाव जाणवतो. ग्रामीण लोकजीवनाशी त्यांची कविता निगडीत असल्याने, साध्या सोप्या, सरळ भाषेत ओवीबद्ध रूपातील गाणी अर्थात त्यांची कविता मोठी मोहक आहे. थोर साहित्यिक, वक्ते, नाटककार, कवी आचार्य अत्रे; बहिणाबाईच्या कवितेला बावनकशी सोन्याची उपमा देतात. अशा थोर कवयित्रीचा थोडक्यात परिचय करून घेऊ|
#SPJ3