'बहीण भावातील भावनिक वीण ' याविषयी तुमचा
अनुभव
Answers
Answer:
बहीण भावातील भावनिक वीण या विषयी तुमचा अनुभव लिहा
Answer:
बहिण भावाचं प्रेमाचे व निखळ नाते असते. या नात्याला किती ही नावे दिली तरी कमीच आहे. एकमेकांना सांभाळून घेणे, जिवापाड प्रेम करणे, कठीण परिस्थितीला एकत्र सामोरे जाणे या सर्व गोष्टी या नात्यामध्ये बघायला मिळतात. अथांग सागराच्या निखळ पाण्याप्रमाणे बहीण भावाचे नाते असते. माझे आणि माझ्या भावाचे नाते अगदी असेच आहे.
आमच्यामध्ये रुसवे-फुगवे, राग या गोष्टी पण आहेत. पण हे रुसवे-फुगवे नावापुरते आहे. यामध्येसुद्धा आमचे प्रेम दडलेले आहे. आजही मला माझ्या रक्षाबंधनाचा दिवस आठवतो. मी भावाची वाट बघत होते. भाऊ बाहेरगावी होता. रक्षाबंधनाच्या दोन दिवस आधीच भावाच्या येण्याकडे माझे डोळे दिपलेले होते. भावाचा फोन आला मी रक्षाबंधनाच्या दिवशी येत आहे. ते ऐकल्यानंतर मला फार आनंद झाला. मग मी तयारीला लागले. छान घर सजवले. भावासाठी माझ्या हाताने सुंदर अशी राखी बनवली. त्याला काय काय आवडते. ते सर्व पदार्थ बनवायचे ठरवले.
अखेर रक्षाबंधनाचा दिवस आला. मी भल्या पहाटे लवकर उठून तयारीला लागले. अंगणात सुंदरशी रांगोळी काढली. पाटाच्या भोवती सुद्धा रांगोळी काढली. हे करत असताना मला खुप आनंद वाटत होता. कारण माझा भाऊच माझ्यासाठी एवढ्या लांबून येणार होता. सकाळपासून मी त्याची वाट बघत बसले होते. वेळ निघत गेली आता मात्र माझा माझा जीव अर्धा होत होता. संध्याकाळची वेळ झाली मला भाऊ येणार नाही. असे वाटायला लागले.मी थोडे निराश झाले. पण ज्यावेळेस दारावरची बेल वाजली आणि मी भावाला दारात बघितले. त्या क्षणी माझा आनंद गगनात मावेनासा झाला. नंतर मी भावाचे औक्षण केले. त्याला राखी बांधली. आणि आम्ही दोघांनी मिळून खूप गप्पा केल्या.
असे अनोखे नाते बहीण भावाचे असते. भाऊ म्हणजे बहिणीचा एक आधारस्तंभ असतो. जिवाला जीव देणारा. असे हे सुंदर नाते निसर्गाने निर्माण केलेले आहे.