Hindi, asked by ppparmar6248, 2 months ago

भ्रमणध्वनी आत्मकथन in marathi please​

Answers

Answered by aratichavan2606
1

Answer:

here is your answer

Explanation:

हाय...मला ओळखलत का ? अस म्हणायची खर तर गरजच नाही, कारण आज काल माझ्या शिवाय तुमचं पान ही हलत नाही अस म्हटल तरी चालेल. मला सांगा माझा वापर तुम्ही सतत करत असता, पण तुम्हाला माझ्या बद्दल काही माहिती आहे का? निदान मला मराठीत 'भ्रमणध्वनी' म्हणतात हे तरी ठाऊक आहे का? हसू नका हं माझ्या मराठीतील नावाला. मला ह्या जगात प्रथम कोणी आणले माहीत आहे? मोटोरोला या कंपनीच्या मार्टिन कूपर ह्या व्यक्तीने, तेही 1976 साली व भारतात मी प्रथम आलो ते 1995 साली.

मला येवून फक्त 20-25 वर्षे झाली असतील, तरी मी आज तुमच्या प्रत्येकाच्या आवडीचा 'जादुई स्वप्नांचा दिवाच' झालोय. माझ्या स्क्रिनवर तुम्ही नुसता टच केलात की हव्या त्या व्यक्तीशी संपर्क करु शकता व संदेश ही पाठवू शकता. अशा त-हेने माझ्यामुळे तुमच्या आयुष्याला नवीच जादुई कलाटणी आली. आज अब्जावधी लोक माझा वापर करतायत, कारण मी फक्त संपर्क करु शकतो; एवढाच माझा मर्यादित वापर नाही तर तळहाता एवढ्या माझ्या जादुई पेटीत खुप खजिना भरलाय. इंटरनेट, रेडिओ, गाणी, बातम्या , कँलक्युलेटर, घड्याळ, जीपीएस्, कँमेरा... माझ्यात काय नाही !

सर्वात आवडती व वेड लावणारी गोष्ट माझ्यात आहे ती म्हणजे ' सेल्फी ' होय. ह्या सेल्फीने सर्व जगाला वेड करुन टाकलय. पण सेल्फी काढता काढता तुम्ही मात्र 'सेल्फीश' कधी झालात हे तुम्हाला ही कळले नाही. हो ना?

होय..माझा उपयोग तुम्हाला खुप होत असला तरी माझा तुम्ही जो अति वापर करताय त्यामुळे तुम्हाला दारु पेक्षा ही महाभयंकर व्यसन जडले आहे.. शेवटी अति तेथे मातीच. डोळ्यांचे विकार, मानदुखी व इतरही अनेक दुष्परिणाम अनेकांना झाले आहेत. सतत तो माझ्यात इतका गुंग झालाय की आपल्या आजुबाजूच्या माणसांचा ही त्याला विसर पडू लागलाय. मी तर असेही ऐकलय की माझ्यामुळे कित्येक घटस्फोटही झालेत.

हो... कारण कुटुंबातील कोणत्याच व्यक्तिला ह्या मोबाईलमुळे एकमेकांशी बोलायलापण वेळ नसतो. प्रत्येकजण घरात आला की आपापला मोबाईल घेऊन बसतो. मुलांनाही आपल्या आई-बाबांना काही सांगायच असल्यास त्यांनी माझ्यातच डोक घातलल असत.तसेच आई-बाबांना मुलांशी बोलायच असल्यास ते माझ्यातच रममाण झालेले असतात.

तेच सर्व नवरा-बयकोच्या बाबतीत दोघंही दुरवर पसरलेल्या आपल्या सर्व मित्र परिवार, सगेसोयरे यांच्याशी संवाद साधण्यात मग्न असतात,

पण शेजारी बसलेल्या आपल्या जिवलगाला सहवास द्यायला मात्र एकमेकांना वेळ नसतो.

खरच, मला तर सगळंच चित्र अवघड दिसतय भविष्याच. कसे हे जग गुण्यागोविंदाने नांदणार?

कशी ही नवीन पिढी नाते संबंध संभाळणार.

म्हणूनच मी विनंती करतो, "हे मानवा Technology च्या इतका अाहारी जाऊ नकोस. हे science

फक्त तुझ्या सोयीसाठी आहे, पण सुख मात्र तुला तुझे प्रियजणच देणार आहेत."

तेव्हा माझा वापर ही गरजे पुरताच करावास असच मला वाटतय. जगात कितीही Technology आली, तरी माणूस माणसामुळेच सुखी होतो हे लक्षात ठेव.

तेव्हा तुला माझी मना पासून कळकळीची विनंती ...

मी आहे बहुउपयोगी म्हणून

करु नकोस अतिरेकी वापर

संयम आणि समन्वय गाठून

कर आयुष्याचं सार्थक..

Answered by Redake
0

Answer:

ब्रांध्वनी आत्मचरित्र

Similar questions