भ्रमणध्वनी : शाप की वरदान nibandh in Marathi
Pls answer quickly
Answers
ट्रिंग ट्रिंग!
हा लक्ष गेलच ना तुमचे माझ्याकडे!
बरोबर ओळखलत मी मोबाईल फोन बोलतोय!
माझा जन्म फोन करण्यासाठी झाला होता पण आता तांत्रिक अडवन्समेंत मुळे माझे वेगवेगळे रूप तुम्हाला बघायला मिळतात. मी वेगवेगळ्या आकारात, प्रकारात, टच स्क्रीन, नंबर फोन मध्ये उपलब्ध असतो.
नुसता कॉलिंग साठी वापरला जाणारा मी हल्ली वेगवेगळे ऍप्लिकेशन, व्हॉटसअप, फेसबुक, इंस्टाग्राम साठी वापरला जातो. माझ्यावर लहान मुले गेम्स खेळतात. ह्यांनी मनोरंजन तर होत पण डोळे खराब होतात आणि हानिकारक रोग होऊ शकतात. पण कसेही असले तरी ब्रह्मंधवणी एक वरदान आहे.
■■भ्रमणध्वनी - शाप की वरदान■■
भ्रमणध्वनीचा आपल्या सगळ्यांच्याच जीवनात महत्वपूर्ण स्थान आहे.
भ्रमणध्वनीचे अनेक फायदे आहेत. त्याचे उपयोग लोकांशी संपर्क करण्यासाठी, महत्वपूर्ण संदेश देण्यासाठी, घरबसल्या वस्तूंची खरेदी करण्यासाठी, बिल भरण्यासाठी, ऑफिसचे काम करण्यासाठी, आपले मनोरंजन करण्यासाठी अशा वेगवेगळ्या प्रकारच्या कामांसाठी केला जातो.
परंतु, भ्रमणध्वनीचे काही तोटे देखील आहेत. भ्रमणध्वनीमुळे आपण आपल्या कामावर,अभ्यासावर नीट लक्ष देत नाही. काही लोकं सामाजिक हिंसा व खोटी बातमी पसरवण्यासाठी फेसबुक,व्हाट्सअॅपचा वापर करतात. अश्लील चित्रे,एमएमएस बनवून लोकांना ब्लैकमेल केले जाते. सारखं भ्रमणध्वनीकडे पहिल्यामुळे आपल्या डोळ्यांनाही त्रास होऊ शकतो.
अशा प्रकारे, भ्रमणध्वनी कधीकधी शाप तर कधीकधी वरदान ठरते. हे आपल्यावर अवलंबून असते की आपण त्याचे कशा प्रकारे उपयोग करतो.