भ्रष्टाचाराच्या संदर्भात केंद्र सरकारने कोणाच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली होती?
Answers
भ्रष्टाचाराचा अर्थ
सत्ता, अधिकार आणि स्थानाचा गैरवापर करणे हा भ्रष्टाचाराचा व्यापक अर्थ आहे. त्याचबरोबर लाच घेणे व देणे, वशिलेबाजी, काळा बाजार करणे, प्रमाणापेक्षा जास्त नफा कमावणे आदींचाही भ्रष्टाचारात समावेश होतो.

सरकारने १९६२ साली के. संथानम यांच्या अध्यक्षतेखाली भ्रष्टाचाराला प्रतिबंध करण्याच्या दृष्टीने एक समिती नेमली होती. या समितीने भ्रष्टाचाराचे स्वरूप निराळ्या प्रकारे स्पष्ट केले आहे. या समितीच्या मते, सरकारी कर्मचारी आर्थिक व अन्य स्वरूपाचा फायदा करून घेण्याच्या पारंपरिक भ्रष्ट मार्गाव्यतिरिक्त इतर स्वरूपाचाही भ्रष्टाचार करतात. तो म्हणजे कमी दर्जाची सेवा देणे, खोटे भत्ते स्वीकारणे, खोट्या पावत्या सादर करणे, सरकारी यंत्रणेचा खासगी कारणांसाठी वापर करणे इत्यादी. थोडक्यात आधुनिक काळात भ्रष्टाचाराची व्याप्ती वाढली आहे. त्याच्या कारणांविषयी व या समस्येच्या निर्मूलनाविषयी थोडक्यात चर्चा करू या.