History, asked by prabodhparve69, 1 day ago

भ्रष्टाचार मुळे काय होते​

Answers

Answered by vaidahimore3907
2

Answer:

एखाद्या व्यक्तिने आर्थिक लाभाकरिता अथवा स्वत:च्या मानसिक समाधानाकरिता अथवा स्वहिताकरिता आपल्या कर्तव्याची जाण न ठेवता दुसऱ्या व्यक्तिला अनैतिकपणे दिलेला त्रास म्हणजे भ्रष्टाचार. भ्रष्टाचार ही एक गंभीर सामाजिक समस्या आहे. या समस्येचे मूळ प्रामुख्याने व्यक्तिच्या अनैतिक व्यवहारात आहे, असे मानले जाते. त्याचबरोबर व्यक्तिच्या सामाजिक, नैतिक मूल्यांचा ऱ्हास हेही भ्रष्टाचाराचे एक महत्त्वाचे कारण म्हणून बघितले जाते. नियमहिनता, असत्यवादिता, अपारदर्शकता या तीन गोष्टी बरेचदा अनैतिकतेच्या गाभ्याशी असल्याचे दिसते. जेव्हा अशा नैतिक मूल्यांचा ऱ्हास होतो, तेव्हा समाजामध्ये भ्रष्टाचार नावाची समस्या उद्भवते. त्याचबरोबर गुंतागुंतीची आणि आंतर्विरोधग्रस्त सामाजिक आणि राजकीय परिस्थितीच प्रचंड प्रमाणातील भ्रष्टाचार वाढण्यास कारणीभूत ठरत आहे.

भ्रष्टाचार या शब्दाची उत्पत्ती भ्रष्ट व आचार या दोन शब्दांच्या एकीकरणातून झाली असून भ्रष्ट असे आचरण म्हणजे भ्रष्टाचार.

Answered by s147510bsalem03146
0

book me likha hua hai jake aache se padh lo

Similar questions