India Languages, asked by TransitionState, 1 year ago

भ्रष्टाचार संपला तर – मराठी निबंध, भाषण, लेख

Answers

Answered by anamika233
2

Answer:

Marathi nahi aati Hai yrr

Answered by halamadrid
6

Answer:

भ्रष्टाचार हा आपल्या समाजातील प्रत्येक क्षेत्रात कर्करोगासारखा पसरत आहे. लोक आपले काम लवकर व सहजतेने करण्यासाठी पैशाची मदत घेतात ज्यामुळे योग्य व गरीब उमेदवारांना काम मिळत नाही. भ्रष्टाचार आपल्या देशाची प्रगती होऊ देत नाही.

प्रत्येकाला वाटते की आपले देश भ्रष्टाचार मुक्त व्हावे.भ्रष्टाचार जर संपला, तर आपल्याला प्रगतीशील आणि वेगळे भारत पाहायला मिळेल.लोकांना त्यांच्या शिक्षण आणि कौशल्याच्या आधारे त्यांच्या कामात यश मिळवता येईल.योग्य उमेदवारांना चांगली पदे मिळतील,ज्यामुळे चांगले व्यवस्थापन आणि नियोजन करण्यास मदत होईल. सार्वजनिक क्षेत्रातील गुंतवणूकीत वाढ होईल, आरोग्य सुविधांमध्ये सुधारणा होईल, देश अधिक सुरक्षित व आरोग्यवान होईल, देशाची अर्थव्यवस्था सुधारेल,रोजगार संधी वाढतील, गरीब आणि निम्न उत्पन्न वर्गातील लोकांचे जीवनमान सुधारेल.

भारत भ्रष्टाचारमुक्त होण्यासाठी आपणही हातभार लावायला हवा. आपण स्वतः तर नाहीच, पण इतरांनाही भ्रष्टाचार करू दिला नाही पाहिजे. भ्रष्टाचाराच्या कार्यात सामील असलेल्या लोकांबद्दल आपण तक्रार केली पाहिजे. भ्रष्टाचारी लोकांवर कठोर कारवाई झाली पाहिजे.आपण लोकांना भ्रष्टाचाराच्या दुष्परिणामांविषयी जागरूक केले पाहिजे.

एकत्रितपणे आपल्याला देशातून भ्रष्टाचार संपवता येईल.

Explanation:

Similar questions