भारत अमेरिका यांच्यात सहकार्याचे संबंध निर्माण होण्या मागील पार्श्वभूमी विशद करा.
Answers
Answered by
3
अमेरिकेत भारताप्रमाणेच लोकशाही आहे, सुरुवातीपासूनच अमेरिका भारताचा महत्वाचा व्यापार भागीदार देश आहे. अनेक भारतीय लोक शिक्षण आणि नोकरी निमित्त अमेरिकेत जातात. तेथील अनिवासी भारतीयांमुळे भारत आणि अमेरिका यांच्यात सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक संबंध निर्माण झाले.
भारताने मुक्त अर्थव्यवस्थेचे धोरण स्वीकारल्यानंतर भारत आणि अमेरिका यांत व्यापार वाढून चांगले संबंध निर्माण झाले आणि भारताची आर्थिक प्रगती होऊ लागली.
१९९८ मध्ये भारताने अणुचाचण्या घेतल्या त्यामुळे भारत अमेरिका संबंधामध्ये तणाव निर्माण झाला होता.
२००५ मध्ये संरक्षण विषयक करार करण्यात आला आणि त्यानंतर २००८ मध्ये आण्विक सहकार्याचा करार करण्यात आला यानंतर भारत आणि अमेरिकेचे संबंध आणखी दृढ होण्यास मदत झाली.
Similar questions