Geography, asked by rravate77, 18 days ago

भारताची गुलामगिरी हा कसला परिपाक होता​

Answers

Answered by Itzmeuradvika
0

Explanation:

गुलामगिरी ही श्रमिकांच्या शोषणाची एक पद्धत आहे. ज्या व्यवस्थेत माणसांना कोणाचीतरी मालमत्ता समजले जाते आणि बळाचा किंवा धाकाचा वापर करून काम करायला लावले जाते, तिला सर्वसाधारणपणे गुलामगिरी किंवा गुलामी अशी संज्ञा आहे. गुलामांना त्यांच्या इच्छेविरुद्ध विकत घेण्यात येत असे किंवा ते जन्मापासूनच गुलाम समजले जात असत. काम सोडून जाण्याचा, कामास नकार देण्याचा किंवा कामासाठी मोबदला मागण्याचा अधिकार त्यांना नसे. काहीं जुन्या गुलामगिरीच्या व्यवस्थांमध्ये मालक गुलामांना ठारही मारू शकत आणि ते कायद्यात बसत होते. इतिहासातील अनेक समाजांनी गुलामगिरीची पद्धत उघडपणे मान्य केली होती. आधुनिक काळात जगभरातील बहुतांश ठिकाणी गुलामगिरी जरी बेकायदा असली, तरीही ती काही स्वरूपात चालू आहेच. उदा: धन्याच्या कर्जात अडकलेले नोकर, घरी कायमस्वरूपी ठेवलेले नोकर, दत्तक घेतलेल्या मुलांचा नोकर म्हणून वापर, मुलांचा सैनिक / क्रांतिकारी / दहशतवादी म्हणून वापर, जबरदस्तीने केलेले लग्न, कामेच्छेसाठी वापरले जाणारे किंवा पुरविले जाणारे गुलाम, इ.गुलामगिरी माणसाच्या लिखित इतिहासाच्याही पूर्वीपासून अनेक संस्कृतींमध्ये चालू होती. आज जगात उपरोक्त प्रकारच्या गुलामांची संख्या १.२ ते २.७ कोटी असावी असा अंदाज आहे,[२] पण एकंदरीत लोकसंख्येच्या मानाने हे प्रमाण ऐतिहासिक प्रमाणांपेक्षा अत्यल्प मानता येईल. यातील सर्वाधिक संख्या दक्षिण आशियातील कर्जबाजारी झालेल्या नोकरांची आहे. अनेकदा ही गुलामी पिढ्यानपिढ्या चालू राहते. बायका आणि मुलांचे लैंगिक शोषण आणि त्यासाठी त्यांची केली जाणारी आयात-निर्यात हा गुलामगिरीचा एक स्वतंत्र भागच आहे.

उद्योगीकरणाच्या आधी गुलाम आणि त्यांची श्रमशक्ती यांना आर्थिक दृष्टीने मोठेच महत्त्व होते. यंत्रयुगात मानवी श्रमांचे आर्थिक महत्त्व कमी होत चालले आहे. नोरबेर्त विनर म्हणतात: "यंत्र शक्तीमध्ये मानवी श्रमांचे आर्थिक मूल्य आहे, पण गुलामगिरीत जी क्रूरता असते ती नाही."

१९व्या शतकाच्या सुरुवातीस गुलाम व भूदास ह्यांची संख्या लोकसंख्येच्या तीन चथुर्तांश होती.[३] यंत्रयुगात प्रचंड प्रमाणावर मजूर लागत नाहीत त्यामुळे गुलामीचे आर्थिक महत्त्व निघून गेले आहे. गुलामी मात्र आर्थिक कारणांसाठी नाही तर मानवी हक्क म्हणून बेकायदेशीर केली गेली.

Similar questions