भारताचा मंगल्यान हा उपक्रम कोणत्या नावाने ओळखला जातो?
Answers
Answer:
मंगळयान ही भारताची पहिली मंगळ मोहीम असून हे यान आंध्रप्रदेश राज्यातील श्रीहरिकोटा येथून सतीश धवन अंतराळ केंद्रावरून मंगळाच्या दिशेने ५ नोव्हेंबर, इ. स. २०१३ रोजी प्रक्षेपित केले गेले
Explanation:
मंगळयान मोहीम माहिती मंगलयान मिशन आजकाल भारतीय अंतराळ संशोधन क्षेत्र खूप बहरात चाललं आहे. भारताने खूप मोठ्या मोहीम यशस्वीपणे पूर्ण करून अख्ख्या जगाला दाखवून दिलं आहे की भारतीय अंतराळ संशोधन संस्था ह्या जगात भारी आहेत. त्यातच एक सर्वात मोठ्ठा आणि सगळ्यात यशस्वी मोहिमेपैकी एक म्हणजे मंगळयान. पृथ्वीवरून चक्क मंगळावर यान पाठवणे काही साधी सोप्पी गोष्ट नाहीये. अंतराळ संशोधन क्षेत्रात पुढारलेल्या देशांना पण हे करणं खूप अवघड गेलंय. परंतु भारताने हे सहज करून दाखवलं. तर ह्याच मंगळयान मोहीम बद्दल आता माहिती घेऊ.
२३ नोव्हेंबर २००८ रोजी, मंगळावर न शोधलेल्या मोहिमेची पहिली सार्वजनिक पावती इस्रोचे तत्कालीन अध्यक्ष जी. माधवन नायर यांनी जाहीर केली. MOM मिशन संकल्पनेची सुरुवात २०१० मध्ये भारतीय अंतराळ विज्ञान आणि तंत्रज्ञान संस्थेने चंद्रयान-१ च्या उपग्रह प्रक्षेपणानंतर व्यवहार्यता अभ्यासाने केली.