भारताची पूर्व किनारपट्टी लांबी
Answers
Answer:
किनारपट्टी मदान आहे. याची लांबी साधारणत: १४०० कि.मी. इतकी आहे. या किनारपट्टीच्या मदानी प्रदेशात गुजरात, महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक तसेच केरळ राज्याच्या किनारपट्टीचा भाग व तमिळनाडू राज्यातील कन्याकुमारी राज्याचा समावेश होतो. पश्चिम किनारपट्टी मदानाचे खालील भागात विभाजन केले जाऊ शकते.
१) कच्छ द्वीपकल्प, २) कच्छचे रण, ३) काठेवाड द्वीपकल्प,
४) गुजरात मदान, ५) कोकण किनारपट्टी, ६) कर्नाटक किनारपट्टी, ७) केरळ किनारपट्टी.
१) कच्छचे रण- कच्छच्या उत्तरेकडच्या सपाट मदानी प्रदेशास कच्छचे रण असे म्हणतात. याचे दोन भाग पडतात १) मोठे कच्छचे रण (The Great Runn) २) छोटे कच्छचे रण (The Little Runn). मोठय़ा कच्छच्या रणात अनेक ठिकाणी क्षारयुक्त पट्टे आढळतात. मोठय़ा कच्छच्या रणात काही ठिकाणी उंचवटय़ाचा प्रदेश बेटांसारखा आढळतो. उदा., पच्चम, खदीर आणि बेला. पच्चम बेटांच्या दक्षिणेला बन्नी येथे मोठा गवताळ प्रदेश आढळतो. मोठय़ा कच्छच्या रणाच्या दक्षिणेला छोटे कच्छचे रण आहे.
२) काठेवाड द्वीपकल्प- कच्छच्या दक्षिण भागात काठेवाड द्वीपकल्प आहे. काठेवाड द्वीपकल्पामध्ये गिरनार पर्वताचा समावेश होतो. याची निर्मिती ज्वालामुखीपासून झाली असावी. गिरनार पर्वताच्या दक्षिणेला घनदाट गिरचे जंगल आहे.
३) कोकण किनारपट्टी- कोकण किनारपट्टीचा विस्तार उत्तरेला दमणगंगेपासून दक्षिणेला तेरेखोल नदीपर्यंत आहे. कोकण किनारपट्टीची लांबी ५३० कि.मी. इतकी आहे. उत्तर कोकणापेक्षा दक्षिण कोकणाचा भाग खडकाळ आणि ओबडधोबड प्रकारचा आहे.
४) कर्नाटक किनारपट्टी- कर्नाटक किनारपट्टीची उत्तर दक्षिण लांबी २२५ कि.मी. इतकी आहे. कर्नाटक किनारपट्टीमध्ये प्रवेश करण्यापूर्वी शरावती नदी ही उंचीवरून खाली येते व तेथे गिरसप्पा धबधबा निर्माण होतो.
५) केरळ किंवा मलबार किनारपट्टी- केरळ किनारपट्टी उत्तरेस कन्नोरपासून दक्षिणेस कन्याकुमारीपर्यंत ५५० कि.मी.पर्यंत असून या किनारपट्टीमध्ये वाळूच्या टेकडय़ा सर्व ठिकाणी आढळतात. वाळूच्या या टेकडय़ांना थेरीर्स असे म्हणतात. वाळूच्या टेकडय़ांमुळे अनेक उथळ खाजण (Lagoons) आणि भरतीच्या पाण्याचा प्रदेश Backwater) तयार झालेला आहे. किनारपट्टीलगत अनेक तळी निर्माण झालेली आहेत.
पूर्व किनारपट्टीचे मदान- पूर्व किनारपट्टीच्या मदानाचे विभाजन
१) ओरिसा २) आंध्र मदान ३) तमिळनाडू मदान अशा पद्धतीने केले जाते.
१) ओरिसा किनारपट्टी- याला उत्कल मदान असेदेखील म्हणतात. उत्कल मदानाची लांबी ४०० कि.मी. इतकी आहे. या किनारपट्टीतच महानदीच्या त्रिभुज प्रदेशाचा समावेश होतो, तसेच ओरिसा किनारपट्टीमध्ये चिल्का सरोवरदेखील आहे. चिल्का सरोवराचा विस्तार ईशान्य नर्ऋत्य असून त्याची लांबी ६५ कि.मी. इतकी आहे. याचे क्षेत्रफळ ७८० चौ.कि.मी. असून, चिल्का सरोवराच्या ईशान्य भागात दया व भार्गवी या नद्या येऊन मिळतात.
२) आंध्र मदान- आंध्र मदानाचा विस्तार उत्तरेकडे उत्कल मदानापासून दक्षिणेकडे पुलिकत सरोवरापर्यंत आहे. आंध्र मदानातून गोदावरी आणि कृष्णा या नद्या वाहतात. कृष्णा आणि गोदावरी नदीच्या त्रिभुज नद्यांच्या दरम्यान कोलेरू सरोवर आहे. कोलेरू सरोवर हे एकमुखाने सागरास जोडलेले आहे.
गोदावरी त्रिभुज प्रदेश- गोदावरी नदी कोलावरम घळईमधून मदानी प्रदेशात प्रवेश करते.
३) पुलिकत सरोवर- आंध्र मदान व तमिळनाडू मदानाच्या सरहद्दीवर पुलिकत सरोवर आहे. तमिळनाडू मदान पूर्व किनारपट्टीस शेवटचा भाग हा तमिळनाडू मदानाचा. या मदानाची लांबी ६७५ कि.मी. असून त्यांची सरासरी रुंदी ही १०० कि.मी. आहे. तमिळनाडू मदानात किनारपट्टीलगत वाळूच्या टेकडय़ा आढळतात. या मदानी प्रदेशातच कावेरी नदीचा त्रिभुज प्रदेश आढळतो. कावेरी नदीच्या त्रिभुज प्रदेशाच्या दक्षिण टोकाजवळ दलदलीचा प्रदेश निर्माण झाला आहे.
भारतीय बेटे- भारतीय बेट समूहांचे खालीलप्रमाणे वर्गीकरण केले जाते. १) बंगाल उपसागरातील बेटे-अंदमान व निकोबार बेटे
२) अरबी समुद्रातील बेटे ३) अपतट बेटे (Offshore Islands)
१) अंदमान व निकोबार बेटे- अंदमान व निकोबार बेट समूहाची उत्तर दक्षिण लांबी सुमारे ५९० कि.मी., तर पश्चिम पूर्व रुंदी सुमारे ५८ कि.मी. इतकी आहे. या बेटांचे क्षेत्रफळ ८२४९ चौ. कि.मी. इतके आहे. अंदमान व निकोबार बेट समूह एकमेकांपासून १० अंश खाडीपासून अलग झालेल्या या बेट समूहातील दक्षिण टोक इंदिरा पॉइंट हे आहे. अंदमानपासून पूर्वेकडे असलेली बॅरन आणि नारकोंडम ही दोन ज्वालामुखीय बेटे आहेत. उत्तर अंदमानात असलेले सॅडल शिखर (७३७ मी.) हे येथील सर्वात उंच शिखर आहे.
२) लक्षद्वीप बेटे- ही प्रवाळजन्य बेटे आहेत. लक्षद्वीप समूहात २७ बेटे असून या बेटांचे प्रत्यक्ष क्षेत्रफळ फक्त ३२ चौ.कि.मी. इतके आहे. लक्षद्वीप बेटे ८ अंश अक्षांश खाडीमुळे मालदीव बेटांपासून अलग झालेले आहेत. ही बेटांची उंची कमी असून येथील मिनीकॉय बेट हे सर्वात मोठे बेट आहे.