भारताचे परराष्ट्र धोरण कोणत्या मूल्यांवर आधारित आहे ?
Answers
कोणत्या राष्ट्रांशी मैत्री करायची,कोणत्या गटात सामील व्हायचे किंवा आंतरराष्ट्रीय राजकारणात कोणती भुमिका घ्यायची इ. विषयी प्रत्येक देशाला निर्णय घ्यावे लागतात. असे निर्णय घेतांना ते विचारपूर्वक घ्यावे लागतात या वैचारिक चौकटीला " परराष्ट्र धोरण " असे म्हणतात.
परिस्थिती आणि काळानुसार परराष्ट्र धोरणात बदल होत असले तरी काही देशांचे परराष्ट्र धोरण काही मूल्यांवर आधारलेले असते.
भारताचे " परराष्ट्र धोरण " --
शांतता , मानवी हक्क , सुरक्षितता या मूल्यांवर आधारलेले आहे.
Answer:
1947 आली भारताला स्वातंत्र्य मिळाले आणि तेव्हापासून भारताने आपले परराष्ट्र धोरण स्वतंत्रपणे आखण्यास सुरुवात केली मार्गदर्शक तत्वां मधील कलम 51 परराष्ट्र धोरणाची एक व्यापक चौकट स्पष्ट करण्यात आली आहेत आणि राष्ट्रांशी मैत्रिपूर्ण संबंध ठेवणे व आंतरराष्ट्रीय कायद्याचा आदर करणे हेही आपल्या परराष्ट्र धोरणाचे उद्दिष्ट मानले आहे