Hindi, asked by parthmankargmailcom, 3 months ago

भारताचा राष्ट्रीय खेळ निबंध मराठीमध्ये​

Answers

Answered by pranavbhoir5
2

Answer:

हॉकी : भारताचा राष्ट्रीय खेळ. इतर परदेशी खेळांप्रमाणेच हॉकी हा खेळ भारतात ब्रिटिश सैनिकांद्वारेच प्रविष्ट झाला. या खेळाचा इतिहास खूपच मनोरंजक आहे. ईजिप्तमध्ये इ. स. पू. ४००० वर्षांपूर्वीची हॉकी- सदृश रेखाटलेली चित्रे उपलब्ध आहेत. प्राचीन ग्रीसमध्ये इ. स. पू. पाचव्या शतकातील एका भित्तिचित्रात दोन स्पर्धक लाकडाच्या फळकुटाने चेंडू-सारख्या वस्तूवर प्रहार करीत असल्याचे दृश्य आहे. मध्ययुगात यूरोपात हॉकीसारख्या खेळाला हर्लींग (आयर्लंड), शिंटी (स्कॉटलंड), बॅन्डी( वेल्स-इंग्लंड) अशी नावे प्रचलित होती. भारतात पंजाबमध्ये अशाच प्रकारचा ‘खिद्दी खुंडी’ नामक खेळ होता. गाल्वेच्या (आयर्लंड) कायद्यात १५२७ मध्ये सर्वप्रथम हॉकी या शब्दाचा वापर अधिकृतपणे करण्यात आला. १८६१ मध्ये ब्लॅक हीथ रग्बी अँड हॉकी क्लबची स्थापना इंग्लंडमध्ये झाली. इंग्लंडमध्येच १८८६ मध्ये हॉकी असोसिएशनची स्थापना झाली व सुसूत्र नियमावली तयार करण्यात आली. ऑलिंपिक सामने सुरू झाल्यावर दुसऱ्याच वर्षी त्यांत हॉकीचा अंतर्भाव करण्यात आला. हॉकीच्या खेळाची अधिकृत नियमावली तयार झाल्यापासून त्याच्या स्वरूपात आमूलाग्र बदल झाला. शिवाय तो कमी खर्चाचा खेळ असल्या-मुळे सर्व स्तरांतील लोकांना परवडणारा ठरला. तो अनेक देशांचा राष्ट्रीय खेळ झाला असून केन्या, जपान, न्यूझीलंड, पाकिस्तान, ऑस्ट्रेलिया, भारत या पूर्वेकडील देशांत अत्यंत लोकप्रिय आहे. भारतात कलकत्ता( कोलकाता) येथे १८८५ मध्ये पहिला हॉकी क्लब स्थापन झाला. इंडियन हॉकी फेडरेशनची स्थापना ७ नोव्हेंबर १९२५ रोजी झाली. १९२८ मध्ये ॲम्स्टरडॅम ऑलिंपिक स्पर्धेत भारतीय संघाने हॉकीचे सुवर्णपदक प्राप्त केले आणि त्यानंतर १९३२–५६ पर्यंत ऑलिंपिकमधील हॉकीच्या सुवर्णपदकांवर फक्त भारताचेच नाव कोरले गेले. १९६४ आणि १९८० मध्ये पुन्हा भारताने ऑलिंपिकमध्ये सुवर्णपदके मिळविली. १९७० च्या दशकात कृत्रिम हिरवळीवर सामने खेळवले जाऊ लागले आणि भारतीय संघाच्या खेळाला उतरती कळा लागली. १९७१ पासून हॉकीचे विश्वचषक सामने सुरू झाले. दर चार वर्षांनी हे जागतिक सामने होतात.

महिला संघांमध्ये हॉकीचा खेळ खेळविण्यात आल्याचा इतिहासतसा अलीकडचाच आहे. पूर्वी ब्रिटिश विद्यापीठांमधून मुलींमध्ये हॉकी खेळली जात होती पण महिलांची हॉकी संघटना ही १९२७ मध्येसर्वप्रथम स्थापन झाली आणि महिला हॉकी संघ देशपरत्वे तयार झाले. मॉस्को येथील ऑलिंपिकमध्ये महिला हॉकी सामने प्रथम घेण्यात आले (१९८०). त्यांच्यासाठी हॉकीचे स्वतंत्र नियम नाहीत.

हॉकीचे क्रीडांगण : ९१·४० मी. लांब आणि ५५ मी. रुंद( म्हणजेच १०० × ६० यार्ड) एवढ्या

Answered by 98765432155
1

Answer:

ok your answer is here

Explanation:

भारताचा राष्ट्रीय खेळ हॉकी आहे, हे गृहीत धरलेलं आहे, पण ‘अधिकृत’ नाही. तुम्ही प्रश्न विचारताना ‘अधिकृत’ हा शब्द समाविष्ट केला नाही, म्हणून मी हे उत्तर दिलं. तसे पाहिले तर भारतात राष्ट्रीय खेळ म्हणून कोणत्याही खेळाला ‘अधिकृत’ मान्यता दिलेली नाही. सरकारला अनेकांनी माहिती अधिकाराखाली हा प्रश्न विचारला आहे. मात्र, भविष्यात राष्ट्रीय खेळ म्हणून मान्यता द्यायचीच झाली, तर ती हॉकीलाच द्यावी लागेल, असे माझे ठाम मत आहे.

Similar questions