'भारताच्या अणु कार्यक्रमाचे जनक' म्हणून कोण ओळखले जाते
Answers
Answer:
Dr.homi bha bha is known as indian atom
Answer:होमी जहांगीर भाभा यांना 'भारताच्या अणु कार्यक्रमाचे जणक' म्हणून ओळखले जाते.
Explanation:
दोराबजी जमशेदजी टाटा या उद्योगपतीच्या समर्थनाने होमी भाभा यांनी मुंबई येथे टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च नावाची संस्था सुरु केली.या संस्थेमुळे भौतिकशास्त्र,रसायनशास्त्र,गणित,मुक्त ऋण विद्युत्कणांचे शास्त्र या विषयांमध्ये मोठ्या प्रमाणात संशोधन करण्यासाठी सुविधा उपलब्ध झाल्या.
१९५४ मध्ये त्यांनी देशाच्या भल्यासाठी आण्विक ऊर्जेचा जास्तीत जास्त उपयोग करता यावा म्हणून अणु ऊर्जा संस्थेची स्थापना ट्रोम्बे येथे केली.त्यांच्या मृत्यूनंतर या संस्थेचे नाव 'भाभा अणु संशोधन केंद्र' ठेवण्यात आले.
१९४८ मध्ये, अणु ऊर्जा आयोग आणि १९५४ मध्ये,अणु ऊर्जा विभागाच्या निर्मितीमध्ये त्यांची महत्वाची भूमिका होती.
त्यांनी तीन टप्प्यांत एक आण्विक कार्यक्रमाची कल्पना केली,ज्यात विभक्त अणुभट्टीमध्ये नैसर्गिक यूरेनियम,थोरियम आणि प्लूटोनियम यांचे उपयोग समाविष्ट होते.
त्यांच्या या कामगिरीमुळे,त्यांना 'भारताच्या अणु कार्यक्रमाचे जणक' म्हणून ओळखले जाते.