Geography, asked by savitamojad31, 1 day ago

भारताच्या पूर्व किनाऱ्यावर कोणती सरोवरे आहेत?​

Answers

Answered by Ssghodke27
3

Explanation:

भारतातील सर्वात मोठे असे खार्‍या पाण्याचे हे सरोवर आहे. जयपूर पासून 96 किमी व अजमेर पासून 64 किमी अंतरावर राष्ट्रीय हमरस्ता 8 वर हे सरोवर वसले आहे. या सरोवराला पाण्याची आवकही नाही व जावकही नाही. मेंढा, रुपनगढ, खांडेल व कुरियन या नद्यांपासून पाटाने या सरोवरात पाणी आणले जाते. या सरोवरासभोवताल एकूण 38 गावे वसली आहेत. हे सरोवर नागौर व जयपूर जिल्ह्यात पसरले आहे. अजमेर जिल्ह्याची सीमा या सरोवराला भिडली आहे.या सरोवराची लांबी 35 किमी असून रुंदी वेगवेगळ्या ठिकाणी 3 ते 11 किमी पर्यंत पसरली आहे. सरोवराची खोली वेगवेगळ्या ठिकाणी 60 सेंटीमीटर ते 3 मीटरपर्यंत आहे.

या सरोवराचा परीघ 96 किलोमिटर्सचा आहे. हे सरोवर दोन भागात विभागले गेले आहे. या दोन भागांच्या मध्ये 5 किलोमीटर लांबीचा बांध बांधण्यात आला आहे. सरोवराच्या एका भागात पाटाचे पाणी सोडले जाते. पाण्याने एक विशिष्ट उंची गाठली म्हणजे ते पाणी दुस-या भागात सोडण्यात येते. या दुस-या भागात मीठागार आहे. हा भाग म्हणजे एक मोकळे मैदानच आहे. बाष्पीभवनाने पाणी उडून गेल्यावर तिथे मीठ तयार होते. ही प्रथा हजारो वर्षांपासून चालू आहे. उन्हाळ्यात या भागाचे उष्णतामान 40 डिग्रीपर्यंत वाढते. या सरोवरातून दरवर्षी 210 हजार टन मीठ तयार होते. भारताची 9 टक्के गरज हे सरोवर पूर्ण करते. दरवर्षी वेगवेगळ्या हंगामात तयार होणारे मीठ एकसारखे खारट असत नाही. त्यांचा खारटपणा वेगवेगळा असतो.

Similar questions