History, asked by ishugate82, 3 months ago

भारताच्या पंतप्रधानांचे अधिकार कार्य स्पष्ट करा​

Answers

Answered by shreekrishna35pdv8u8
4

Answer:

Explanation:

भारताचे पंतप्रधान हे भारत देशामधील केंद्रीय सरकारचे प्रमुख व देशाच्या राष्ट्रपतीचे प्रमुख सल्लागार आहेत. पंतप्रधान, भारताच्या मंत्रीमंडळाचा व संसदेमधील बहुमत मिळालेल्या राजकीय पक्षाचा नेता आहे. भारत सरकारच्या कार्यकारिणी शाखेचा तो प्रमुख आहे.

पंतप्रधान बनणाऱ्या व्यक्तीला संसदेच्या लोकसभा व राज्यसभा ह्या दोन भवनांपैकी एकाचा सदस्य असणे बंधनकारक आहे. विद्यमान राष्ट्रपतीने नियुक्ती केलेला भारताचा पंतप्रधान देशामधील सर्वात बलाढ्य नेता समजला जातो. सरकारची स्थापना, मंत्रीमंडळाची निर्मिती, मंत्र्यांना पदे नियुक्त करणे इत्यादी महत्त्वाचे अधिकार पंतप्रधानाला आहेत. पंतप्रधानाचा मृत्यू अथवा राजीनाम्यानंतर मंत्रीमंडळ बरखास्त केले जाते.

Similar questions