Social Sciences, asked by monikagurnule1996, 1 month ago

भारताच्या पश्चिम किनाऱ्यावरील कालिकत बंदरात पोहचला

Answers

Answered by shreekrishna35pdv8u8
2

Explanation:

पोर्तुगीज:-

इ.स. १४९८ मध्ये वास्को-द-गामा हा पोर्तुगीज खलाशी आफ्रिका खंडाच्या दक्षिण टोकाला वळसा घालून तो भारताच्या पश्चिम किनाऱ्यावरील कालिकत बंदरात पोहोचला. तेथील झामोरीन राजाकडून त्याने व्यापारी सवलती मिळवल्या. प्रारंभीच्या काळात भारताच्या राजकारणात पोर्तुगिजांना विशेष महत्त्व होते. पण एकाच वेळी धर्मप्रसार, सत्ताविस्तार आणि व्यापार या गोष्टी करण्याचा पोर्तुगीजांनी प्रयत्न केला; त्यामुळे पोर्तुगीजांना भारतात साम्राज्य निर्माण करता आले नाही. पोर्तुगीजांनी केवळ गोवा, दीव-दमण या प्रदेशवर समाधान मानावे लागले.

डच:-

पोर्तुगीजांच्या नंतर डच भारतात व्यापार करण्याकरिता इ.स. १५९५ मध्ये आले. डचांनी सुद्धा भारतात येऊन व्यापाराला सुरुवात केली. व्यापाराच्या दृष्टीने त्यांनी आपले लक्ष्य आग्नेय आशियातील बेटांवरच केंद्रित केले.

फ्रेंच:-

इ.स. १६२५ पासून फ्रेंचांनी भारतात व्यापार सुरु केला. फ्रेंचांनी केवळ चंद्रनगर, पुद्दुचेरी, कारिकल, येनम व माहे या प्रदेशांवर समाधान मानावे लागले. अल्ट=इंग्रज|इवलेसे|299x299अंश|इंग्रज इंग्रज:-

इंग्रजांनी इ.स. १६०० मध्ये भारताबरोबर व्यापार करण्याकरिता ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना केली. इंग्रज भारतात आले तव्हा उत्तर भारतात मुघलांची सत्ता होती. इंग्रजांनी इ.स. १६१५ मध्ये मुघल बादशहा जहांगिरकडून सुरत येथे वखार स्थापण करण्याची परवानगी मिळवली. सुरवातीस ईस्ट इंडिया कंपनीने भारतात फक्त व्यापार करण्याचे धोरण अवलंबिले होते. औरंगजेब बादशाहच्या मृत्यूनंतर सरदारांनी आपापसातील मतभेदांमुळे मुघल सत्ता कमकुवत झाली. या काळात भारतात राजकीय अस्थिरता निर्माण झाल्यामुळे इंग्रजांनी भारताच्या राजकारणात लक्ष्य द्यायला सुरुवात केली.

Similar questions