भारताच्या राष्ट्रीय क डॉकीपण
खेळाची संपूर्ण
माहिती लिहा .
Answers
हॉकीमध्ये पुरुषांसाठी व महिलांसाठी नियमितपणे भरवल्या जाणाऱ्या अनेक आंतरराष्ट्रीय स्पर्धा आहेत. त्यांत ऑलिंपिक, कॉमनवेल्थ, हॉकी विश्वचषक, चँपियन्स चषक व युवा हॉकी विश्वचषक या स्पर्धांचा समावेश होतो.
आंतरराष्ट्रीय हॉकी संघटन (एफ.आय.एच) ही या खेळाची सर्वोच्च संघटना आहे. ती हॉकी विश्वचषक व महिला हॉकी विश्वचषक या आंतरराष्ट्रीय स्पर्धांचे आयोजन करते, तसेच खेळांची नियमावली ठरवते. हाॅकी खेळात ३५-३५ मिनिटांचे दोन भाग(हाफ) असतात तर दोन हाफच्यामध्ये १० मिनिटांचा ब्रेक असतो(विश्रांति घेतली जाते).
अनेक देशांमध्ये क्लब हॉकी स्पर्धा आहेत. जगात फुटबॉल व क्रिकेटनंतर सर्वात जास्त खेळाडू असणारा हा खेळ आहे.
ज्या देशात हिवाळ्यातील उन्हामुळे मैदानात हा खेळ खेळता येत नाही तेथे हा खेळ एखद्या छताखाली.खेळला जातो. इंडोअर फील्ड हॉकीचे नियम नेहमीच्या हॉकीपेक्षा वेगळे आहेत. उदा. एका संघात नियमित ११ ऐवजी फक्त, ६ खेळाडू असतात. मैदानाचा आकार बहुधा ४० मी x २० मीटर असा असतो. (मराठी शब्द सुचवा) ह्या मैदानाच्या क्षेत्रफळ ८०० चौरस मीटर इतके असते. शूटिंग सर्कल ९ मीटर आकारमानाचे असते.. मैदानाला सीमांऐवजी (मराठी शब्द सुचवा) अडथळे (अवरोधके) असतात.
मेजर ध्यानचंद हे भारतीय हॉकी खेळाचे जादूगार आहेत. जे स्थान पेले यांना फुटबाल या खेळात आहे, तेच स्थान हॉकी या खेळात मेजर ध्यानचंद यांना आहे. मेजर ध्यानचंद यांचा जन्म २९ ऑगस्ट १९०५ रोजी झाला होता