भारताच्या दूरदर्शन विकासाची वाटचाल थोडक्याता लिहा
Answers
Answered by
12
भारतीय दूरदर्शनच्या विकासाची वाटचाल थोडक्यात लिहा.
ans.-
दूरचित्रवाणीवरील कार्यक्रम प्रेक्षेपित करणारी भारत सरकारची एक संस्था. माहिती व नभाेवाणी खात्यापासून स्वतंत्र रीत्या दूरचित्रवाणीवरील कार्यक्रम संयोजित करण्यासाठी दूरदर्शन ही संस्था १ एप्रिल १९७६ राेजी स्थापन करण्यात आली.
भारतात दूरचित्रवाणीचा विकास १९६० नंतरच विशेषत्वाने घडून आला. सप्टेंबर १९५९ मध्ये पहिले दूरचित्रवाणी केंद्र यूनेस्कोच्या मदतीने प्रायोगिक स्तरांवर दिल्ली येथे सुरू करण्यात आले. प्रथम त्याचे स्वरूप एक मार्गदर्शी दूरचित्रवाणी प्रकल्प असे होते आणि त्यावरून आठवड्यातून फक्त शैक्षणिक कार्यक्रम होत. हळूहळू ते सर्वांगांनी परिपूर्ण करण्यात आले.
Similar questions