भारताच्या उत्तरेकडून दक्षिणेकडे जाताना तापमान वाढत जाते. *
Answers
αɳรωεɾ
नई दिल्ली: भारत में औसत तापमान 4.4 डिग्री सेल्सियस बढ़ने का अनुमान है, जबकि सदी के अंत तक गर्मी की लहरों की तीव्रता 3-4 गुना बढ़ने की संभावना है, देश में जलवायु परिवर्तन के प्रभाव पर एक सरकारी रिपोर्ट।
Answer:
भारतीय हवामानात भारताच्या वैविध्यपुर्ण हवामानाचा समावेश होतो. भारताचे हवामान हे साधारणपणे मौसमी हवामानाच्या प्रदेशात जरी मोडत असले तरी जगात कुठेही न आढळणारी हवामानातील विविधता येथे आढळते. भारतात साधारणपणे ६ मुख्य प्रकारचे हवामान आढळून येतात त्यात अंदमान मध्ये आढळणारे विषुववृत्तीय सदाहरीत जंगलांपासुन ते पश्चिम राजस्थान मधील थरचे वाळवंट पण आढळते. दक्षिण भारतातील उष्ण दमट हवामानापासुन ते उत्तरेतील हिमालयामध्ये पाइन वृक्षाची जंगले तसेच हिमनद्या व शीत वाळवंटाचा समावेश होतो. परंतु या वैविध्यतेत सर्वात महत्त्वाचा घटक आहे ते मौसमी वारे व त्यानी येणारा पाउस ज्यावर संपुर्ण भारत, खासकरुन शेती उद्योग अवलंबुन आहे. भारतात ढोबळमानाने ४ ऋतु आढळून येतात. मौसमी पावसाचा काळ (जून ते सप्टेंबर), मौसमी पावसानंतरचा काळ (ऑक्टोबर ते डिसेंबर), हिवाळा (जानेवारी व फेब्रुवारी) व उन्हाळा (मार्च ते मे).
भारतीय हवामानात वैविध्यता येण्यास मुख्यत्वे येथील भौगोलिक परिस्थिती जवाबदार आहे व हवामानाचे संपुर्ण नियंत्रण हे उत्तरेतील हिमालय व पश्चिमेतील थरच्या वाळवंटामुळे होते. हिमालय मुख्यत्वे उत्तरेकडून गोबीच्या वाळवंटाकडून येणारे जबरदस्त थंड वारे रोखुन धरतो व थरचे वाळवंट हे दक्षिणेतील हिंद महासागरातू व अरबी समुद्रातुन बाष्पयुक्त वारे आकर्षित करतो. यामुळे भारताचे एकुणच हवामान वर्षभर गरमच असते. तसेच कर्कवृत हे भारताच्या साधारणपणे मध्यभागातून जात असल्याने भारताला तसे विषुववृतिय देशातच धरले जाते. इतर विषुववृतिय देशांप्रमाणे भारतात देखील हवामानात टोकाचे बदल होउ शकतात. खूप पाउस, प्रचंड दुष्काळ, चक्रिवादळे, पुर व इतर नैसर्गिक आपत्तिंचा या देशाला बरेचदा सामना करावा लागतो.
वर नमुद केल्या प्रमाणे भौगोलिक परिस्थितीचा भारतीय हवामान वैविध्यपुर्ण होण्यात खूप वाटा आहे. भारतीय हवामान हे हिमालय तसेच पश्चिमेला हिंदुकुश पर्वत व थारच्या वाळवंटाने मुख्यत्वे नियंत्रित होते. हे पर्वत उत्तरेकडुन येणारे थंड वारे रोखुन धरतात व थारचे वाळवंट हे दक्षिणेतील हिंद महासागरातुन व अरबी समुद्रातुन बाष्पयुक्त वारे आकर्षित करतो जे जुन ते सप्टेंबर या महिन्यात भारताच्या बहुतेक भागात पाउस पाडतात. भारताच्या सर्व भागात पावसाचे प्रमाण हे असमतोल आहे. यात मुख्यत्वे स्थानिक भौगोलिक परिस्थितीचा मोठा वाटा आहे. भारतात पावसाच्या प्रमाणानुसार सात मुख्य हवामानाचे झोन आहेत. व त्यांची वर्गवारी पडणारा पाऊस तापमान यावर केली आहे.
Explanation: