भारताच्या व ब्राझील देशांच्या भूसीमा व सागरी सीमा दिशेनूसार सांगा
Answers
भारताच्या भूसीमेची एकूण लांबी १५२०० किमी आहे. भारताच्या शेजारील राष्ट्रे व भूसीमा .
Answer:
१. भारताच्या भूसीमा व सागरी सीमा
२. ब्राझीलच्या भूसीमा व सागरी सीमा
Explanation:
१. भारताच्या भूसीमा व सागरी सीमा:
१. भारताच्या वायव्य दिशेस पाकिस्तान हा देश आहे. या देशाची भूसीमा भारताला लागून आहे.
२. तसेच अफगाणिस्तान हा देशही भारताच्या वायव्य दिशेस असून भूसीमा भारताला लागून आहे.
३. भारताच्या ईशान्य दिशेस चीन हा देश आहे. या देशाची भूसीमा भारताला लागून आहे.
४. तसेच नेपाळ हा देशही भारताच्या ईशान्य दिशेस असून या देशाची भूसीमा भारताला लागून आहे.
५. भारताच्या पूर्व दिशेस बांग्लादेश हा देश आहे. या देशाची भूसीमा भारताला लागून आहे.
६. तसेच म्यानमार हा देश पूर्व दिशेस असून या देशाची भूसीमा भारताला लागून आहे.
७. भारताच्या पूर्व दिशेस बंगालचा उपसागार आहे.
८. भारताच्या पश्चिम दिशेस अरबी समुद्र आहे.
९. भारताच्या दक्षिण दिशेस हिंदी महासागर आहे.
१०. भारताच्या दक्षिणेकडील श्रीलंका या देशाची सागरी सीमा भारताला लागून आहे.
२. ब्राझीलच्या भूसीमा व नागरी सीमा:
१. ब्राझीलच्या उत्तरेकडे गियाना, फ्रेंच गियाना, सुरीनाम, व्हेनेझुएला या देशांच्या भूसीमा ब्राझीलला लागून आहेत.
२. ब्राझीलच्या वायव्य दिशेस कोलंबिया या देशाची भूसीमा ब्राझीलला लागून आहे.
३. ब्राझीलच्या पश्चिम दिशेस पेरू या देशाची भूसीमा ब्राझीलला लागून आहे.
४. तसेच ब्राझीलच्या पूर्व दिशेस असलेल्या बोलिव्हिया या देशाची भूसीमा ब्राझीलला लागून आहे.
५. ब्राझीलच्या नैऋत्य दिशेस पॅराग्वे, अर्जेंटीना आणि उरुग्वे या देशांच्या भूसीमा ब्राझीलला लागून आहेत.
६. ब्राझीलच्या आग्नेय दिशेस दक्षिण अटलांटिक महासागर आहे.
७. तर, ब्राझीलच्या ईशान्य दिशेस उत्तर अटलांटिक महासागर आहे.