भारत एक महासत्ता मराठी निबंध 10 साठी suitable plz??
Answers
यावर्षी देशभरात ७४ वा स्वातंत्र्यदिन साजरा करण्यात येणार आहे. १५ ऑगस्ट हा राष्ट्रीय सण देशात दरवर्षी उत्साहात साजरा केला जातो. करोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा सगळीकडे ऑनलाइन कार्यक्रम होत आहेत. याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र शैक्षणिक विभागाने १५ ऑगस्ट रोजी शाळांमध्ये घेण्यात येणाऱ्या ऑनलाइन कार्यक्रमांसंदर्भातील निर्देश जाहीर केले आहेत. सर्व विद्यार्थी आपापल्या घरी राहून या उपक्रमात सहभागी होऊ शकतात. शालेय विभागाने जाहीर केलेल्या पत्रकामध्ये यासंदर्भात सविस्तर माहिती देण्यात आली आहे.
क्रांतीविरांनी देशासाठी दिलेल्या बलिदानाची आठवण विद्यार्थ्यांना व्हावी, त्यांच्यामध्ये राष्ट्रीय एकात्मतेची भावना निर्माण व्हावी या उद्देशाने राज्यातील शाळांमध्ये पहिली ते बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या दिवसभराच्या कार्यक्रमात वृक्षारोपण, आंतरशालेय, आंतर महाविद्यालय स्तरावर ऑनलाइन पद्धतीने वाद-विवाद स्पर्धा, प्रश्न मंजुषा/ देशभक्तीपर निबंध आणि कविता, चित्रकला स्पर्धा, देशभक्तीपर गीत गायन, वक्तृत्व स्पर्धा, स्वातंत्र्य संग्रामाच्या दुर्मिळ छायाचित्रांचे संकलन असे विविध उपक्रम ऑनलाइन/ऑफलाइन उपक्रम घेण्याची सूचना देण्यात आली आहे