Geography, asked by sutarsonali510, 3 months ago

भारत हा देश प्रमुख जागतिक बाजारपेठ म्हणून ओळखला जातो.​

Answers

Answered by pradeepkrverma
9

Explanation:

मित्रांनो, इयत्ता सहावीपासूनच सामाजिक शास्त्राच्या अभ्यासक्रमात आपण ‘भूगोल’ विषयाचा स्वतंत्रपणे अभ्यास करत आहोत. पृथ्वीच्या चार आवरणांसंबंधी विविध संकल्पना, प्रक्रिया व घटक यांची आपल्याला तोंडओळख झाली आहे. मानवी वस्त्यांचा विकास कसा होतो, मानव त्याच्या उपजीविकेसाठी नैसर्गिक साधनसंपत्तीचा वापर कशाप्रकारे करतो, कच्च्या मालाचे रूपांतर अधिक उपयुक्त पक्क्या मालात कशाप्रकारे केले जाते, ही उत्पादने स्थानिक तसेच जागतिक बाजारपेठेत कशाप्रकारे विक्रीसाठी पाठवली जातात, इत्यादींचाही अभ्यास आपण केला आहे. पर्यावरणातील साधनसंपत्तीचा अमर्याद वापर करण्याचे दुष्परिणामही आपण विचारात घेतले आहेत. भूगोल विषय अधिक चांगल्या प्रकारे समजण्यासाठी आपल्याला पुढील क्षमता आत्मसात कराव्या लागतात.

निरीक्षण, वर्गीकरण, फरक, तुलना,

आलेख, आकृत्या आणि नकाशा यांचे वाचन

मूल्यमापन, विश्लेषण, निष्कर्ष, सादरीकरण, चिकित्सक विचार

या क्षमता आत्मसात करण्यासाठी आपण आत्तापर्यंत शिकलेल्या भौगोलिक संकल्पना व प्रक्रियांचा उपयोग प्रदेशांच्या अभ्यासात करून अपेक्षित अध्ययन क्षमतांपर्यंत पोहोचणे आवश्यक आहे. यातून आपल्याला भूगोलाच्या ज्ञानाचे उपयोजन करता येऊ शकते. या इयत्तेत आपण असा अभ्यास दोन देशांच्या संदर्भात करणार आहोत. या वर्षी, आतापर्यंत शिकलेल्या विविध संकल्पनांची उजळणी करणार आहोत. हा अभ्यास तुम्हांला भूगोलाचे सखोल ज्ञान प्राप्त करण्यास व त्याच्या उपयोजनासाठी मदत करेल. त्याचबरोबर विविध नैसर्गिक व मानवी घटना समजण्यासाठी उपयुक्त ठरेल. भौगोलिक संकल्पनांचे उपयोजन करून प्रदेशाचा अभ्यास केल्याने प्रदेशातील प्राकृतिक परिस्थितींची चांगली जाण होते. प्रदेशातील लोकांनी परिसराशी कसे जुळवून घेतले आहे ते समजते. संसाधनांच्या अतिवापरातून निर्माण होणाऱ्या समस्या कळतात. पर्यावरण ऱ्हासाचा व त्यांवरील उपायांचा विचार करता येतो. घटनांचा कल लक्षात घेऊन तुम्हांला त्यातील बदलांची प्रक्रिया समजावून घेता येईल. भविष्यात काय होईल याचा अंदाज करता येईल. नैसर्गिक दुर्घटना व आपत्ती यांना अधिक सक्षमपणे तोंड देता येईल शिवाय प्रादेशिक असमतोल व त्याची कारणे लक्षात घेऊन त्यांवर उपाय योजना करणे शक्य होईल.

Answered by HanitaHImesh
0

खाली सूचीबद्ध केलेल्या कारणांमुळे भारत एक प्रमुख जागतिक बाजारपेठ म्हणून ओळखला जातो -

  • अमेरिका, चीन, जपान आणि हाँगकाँगनंतर भारत हा जगातील पाचव्या क्रमांकाचा बाजार भांडवलदार आहे.
  • गेल्या दशकात, भारताचे बाजार भांडवल वार्षिक 12.1% वाढले, तर जागतिक समभाग बाजार मूल्य 8.4% ने वाढले.
  • सेल फोन, ऑटोमोबाईल्स, ट्रॅव्हल आणि टुरिझम, डीव्हीडी, डिजीकॅम आणि लॅपटॉप यासह भारत ही सर्वात वेगाने वाढणारी बाजारपेठ आहे.  
  • सेल फोन्समध्ये भारत तब्बल 60 टक्क्यांनी वाढत आहे.  
  • ऑटोमोबाईल्समध्ये, भारताने गेल्या वर्षी टॉप 15 प्रवासी कार-उत्पादक देशांमध्ये सर्वात जलद वाढ नोंदवली.
  • नाममात्र ग्रोथ डोमेस्टिक प्रोडक्ट द्वारे भारत जगातील सहावी सर्वात मोठी अर्थव्यवस्था आणि क्रय शक्ती समानतेनुसार तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था मानली जाते.

#SPJ3

Similar questions