भारतासमोरील विषमतेची आव्हाने कोणती
Answers
Answer:
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने डॉ. नरेंद्र दाभोलकर स्मृती व्याख्यानासाठी मला निमंत्रण दिले, हा मी माझा बहुमान समजतो. मात्र यामुळे मी फार खूश आहे, असे म्हणता येणार नाही. ज्या गंभीर घटनेमुळे तर्कनिष्ठा, वैज्ञानिक दृष्टिकोन, उच्चारस्वातंत्र्य, सामाजिक व आर्थिक न्याय आणि धर्मनिरपेक्ष व पुरोगामी लोकशाहीवाद जागृत करण्याची वेळ आपल्यावर आली आहे; ती घटनाच मुळी कधी घडायला नको होती.२१ व्या शतकातील भारतात धर्मांधता, जातीयवाद आणि द्वेष पसरवणारी संघटित विचारधारा व राजकारण वाढते आहे. त्याचा परिणाम म्हणून झालेल्या हिंसेमुळे अकाली मृत्युमुखी पडलेल्या पुरुष, स्त्रिया आणि मुलांची प्रचंड मोठी यादी भयावह आहे. परंतु आज येथे मी चार जणांचा उल्लेख करू इच्छितो. त्यांच्या विचार व आदर्श यातील स्पष्टता, त्याबद्दल असणारी अतूट वचनबद्धता, प्रामाणिकपणा, उक्तीनुसार कृती करण्याची वृत्ती आणि निडर स्वभावामुळे ते उठून दिसतात. या चार व्यक्ती म्हणजे नरेंद्र दाभोलकर, गोविंद पानसरे, एम. एम. कलबुर्गी आणि गौरी लंकेश.यातील प्रत्येक जण आपल्या विचारांसाठी आणि ध्येयासाठी अथक परिश्रम करीत राहिले. पण या साऱ्यांचे आयुष्य, त्यांचे कार्य आणि त्यांचा अनैसर्गिक मृत्यू या साऱ्यात एक समान धागा आहे. कोणती संघटना, कोणती विचारधारा, कोणत्या प्रकारचे षडयंत्रकारी आणि खुनी याचे भाग आहेत, हे आता गुपित राहिलेले नाही, ते कधीच गुपित नव्हते. समाजामध्ये एक भयाचे वातावरण तयार करण्यासाठी थंड डोक्याने हा खून करण्यात आला. या खुनातील संथ गतीने चाललेल्या तपासामुळे यातील केवळ क्षुल्लक तपशीलच आपल्यासमोर येत आहेत.डॉ. दाभोलकर हे एक असामान्य व्यक्तिमत्त्व होते. त्यांचे खासगी व सार्वजनिक जीवन आणि त्यांनी तर्क, विज्ञान, तत्त्वज्ञान आणि सामाजिक न्याय यांविषयी मांडलेल्या विचारांमध्ये सुसंगती होती. ते आपल्या तत्त्वांसाठी जगले आणि त्यासाठीच त्यांनी आपले प्राण दिले, असे म्हणणे चुकीचे होणार नाही. इंग्रजीमध्ये भाषांतर झालेल्या त्यांच्या तीन पुस्तकांवर मी नजर टाकली. त्यापैकी दोन खंडातील ‘तिमिरातून तेजाकडे’च्या पहिल्या भागात अंधश्रद्धाविरोधी चळवळीची ठाशीव भूमिका आपल्याला कळते, तर दुसऱ्या खंडात श्रद्धेची शास्त्रीय चिकित्सा केल्याचे दिसून येते. त्यांचे तिसरे पुस्तक ‘विचार तर कराल’ हे वैज्ञानिक दृष्टिकोन कसा विकसित करावा याचे व्यावहारिक चिंतन आहे.
Answer:
भारतासमोरील आर्थिक विषमता म्हणजेच व्यक्तीव्यक्ती मध्ये कुटुंबाकुटुंबामध्ये राष्ट्रीय उत्पन्नाची विभागणी विषम प्रमाणात झालेली असते त्याचप्रमाणे सामाजिक विषमता प्रादेशिक विषमता ही भारतासमोरील आव्हाने होती.