भारत सरकारने करोना व्हायरसचे संक्रमण रोखण्यासाठी लोकांच्या जनजागृतीसाठी कोणता अॅप लाँच केला आहे?
Answers
उत्तर :
आरोग्य सेतू
भारत सरकारने कोरोना व्हायरसचे संक्रमण रोखण्यासाठी, लोकांच्या जनजागृतीसाठी आरोग्य सेतू हा ॲप लाँच केला आहे.
संपूर्ण विश्वामध्ये कोरोना व्हायरस मुळे चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली होती. या व्हायरस चे संक्रमण दिवसेंदिवस वाढत चालले होते यालाच आळा घालण्यासाठी लोकांच्या जनजागृतीसाठी भारत सरकारने 'आरोग्य सेतू' ॲप लॉन्च केला.
कोविड-19 चा धोका आढळून आल्यास 'आरोग्य सेतू' ॲप मुळे अलर्ट होण्यास मदत होते. कोरोनाच्या संसर्गापासून वाचण्यासाठी आणि कोविड-19 चा धोका दिसल्यास अलर्ट करण्यासाठी हा ॲप मदत करतो.
'आरोग्य सेतू' ॲप 11 भाषांमध्ये उपलब्ध आहे.
↪☯ आरोग्य सेतू ☯↩
काय आहे हा आरोग्य सेतू ॲप ?
➻ कोविड-19 महामारीच्या काळात लोकांना मदत करण्याचा प्रयत्न म्हणून आणि भारतीय नागरिकांना आवश्यक आरोग्य-संबंधित माहितीशी जोडण्याकरिता भारत सरकारने आपले आरोग्य सेतू ॲप लाँच केले आहे.
हे ॲप कशासाठी विकसित केलेले आहे ?
➻ सध्या सुरू असलेल्या साथीच्या आजाराशी लढा देण्यासाठी आणि आरोग्य विभागाला अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी मदत करण्यासाठी हे ॲप विकसित केले आहे.
हे ॲप आपल्याला कशा प्रकारे मदत करते ?
➻ आरोग्य सेतू हे मोबाईल ऍप्लिकेशन लोकांना त्यांच्या कोविड 19 संसर्गाच्या संभाव्य धोक्याची व सरकारने जारी केलेल्या विविध सूचनांबद्दल अधिक माहिती देते .
➻ भारतीय नागरिकांचे मोठ्या प्रमाणावर पसरलेल्या कोरोना व्हायरस पासून संरक्षण करण्यासाठी वैद्यकीय सल्ला देखील प्रदान करते आणि तुमच्या संपर्कांपैकी एकाची चाचणी पॉझिटिव्ह आल्यास हे आरोग्य सेतू ॲप तुम्हाला अलर्ट देखील करेल .