Chemistry, asked by saniyamakandar22, 3 months ago

भारतात खनिज तेलाच्या खाणी कोठे कोठे आहेत.​

Answers

Answered by AbhilabhChinchane
2

Answer:

खनिज तेल : (पेट्रोलियम). खडकात आढळणाऱ्या नैसर्गिक तेलाला खनिज तेल म्हणतात. त्यामध्ये मृत्तिका, काही खनिजे, धातू इ. पदार्थही अल्प प्रमाणात असतात. अशा तेलाचे ऊर्ध्वपातनाने (वाफ करून व मग ती थंड करून द्रव पदार्थ मिळविण्याच्या क्रियेने) परिष्करण (शुद्धीकरण) करून त्यापासून गॅसोलीन (पेट्रोल), केरोसीन (रॉकेल), जळणासाठी वापरण्यात येणारा वायू इ. पदार्थ मिळवितात. म्हणून नैसर्गिक खनिज तेलाला कच्चे तेल(क्रूड ऑइल) असेही म्हणतात. पेट्रोल हा शब्द भारतात व इतर काही देशांत सामान्यपणे मोटारगाड्यांमध्ये वापरल्या जाणाऱ्या गॅसोलिनासाठी वापरतात. हे पेट्रोल खनिज तेलाचा केवळ एक भाग असते. पेट्रोलियम ही संज्ञा लॅटिन भाषेतील ‘पेट्रा’ म्हणजे खडक आणि ‘ओलियम’ म्हणजे तेल या शब्दांपासून तयार झालेली आहे. म्हणजे पेट्रोलियमाचा शब्दशः अर्थ शिला-तेल असा आहे.

निरनिराळ्या तेलक्षेत्रांतील खनिज तेलांचे रासायनिक संघटन अगदी सारखेच नसते, पण ती मुख्यतः हायड्रोकार्बनी संयुगांच्या मिश्रणांची बनलेली असतात. खडकात आढळणारी हायड्रोकार्बने कधीकधी वायूच्या, तर कधी अतिशय श्यान (दाट) द्रवाच्या किंवा कधीकधी घन स्वरूपात असतात. हायड्रोकार्बनांची घनस्थिती म्हणजे बिट्युमेन व अस्फाल्ट, द्रवस्थिती म्हणजे तेल व वायुस्थिती म्हणजे ⇨नैसर्गिक वायू होय. कित्येक ठिकाणी तेलाबरोबर वायुरूप वा घनरूप हायड्रोकार्बने कमीअधिक प्रमाणात आढळतात. म्हणून कधीकधी त्यांचाही समावेश खनिज तेल या संज्ञेत केला जातो.

इतिहास : खनिज तेल सु. चार हजार वर्षांपासून माहीत आहे. काळ्या व कॅस्पियन समुद्रांभोवतालच्या प्रदेशांत तेल व वायू बाहेर पडतात, हे इ. स. पूर्वी माहीत होते. मध्यपूर्वेत इराण, इराक, सौदी अरेबिया व ईजिप्त या भागांत प्राचीन काळी पृष्ठभागावर असलेल्या निक्षेपातील (साठ्यातील) अस्फाल्टी बिट्युमेनाचा निरनिराळ्या प्रकारांनी उपयोग करीत व त्याला स्लाइम, पिच, बिट्युमेन किंवा अस्फाल्ट या अर्थांची नावे प्रचलित होती. या भागांत प्राचीन काळी संयोजक (सिमेंट) म्हणून बिट्युमेन वापरीत असत. रत्ने जडविणे, हत्यारे व उपकरणे यांची पाती मुठीत घट्ट बसविणे, रस्ते बांधणी, औषधे, जहाजांच्या भेगा बुजवून त्या जलाभेद्य करणे इत्यादींसाठी बिट्युमेन वापरीत, तसेच प्रेते गुंडाळण्याच्या पदरांमध्ये बिट्युमेन वापरल्याचे आढळते. ईजिप्शियन लोक ममी व्यवस्थितपणे गुंडाळून बांधण्यासाठी अस्फाल्ट वापरीत. एक इमारती कमान बांधण्यासाठी पिच (डांबर) वापरण्यास बायबलमध्ये सांगितले आहे. तसेच बॅबलचा मनोरा बांधताना स्लाइम (बिट्युमेन) संयोजक म्हणून वापरल्याचा उल्लेख आहे. नैर्ॠत्य इराणात बिट्युमेनयुक्त पदार्थ चार हजार वर्षांपूर्वीपासून वापरात आहेत. बिट्युमेनयुक्त वालुकाश्माच्या सुमेरियन कालीन कलाकृती पुष्कळ संग्रहालयांत आहेत. इराकमध्ये अस्फाल्ट व तेल भिन्नभिन्न उपयोगांसाठी इ. स. पू. ४००० च्या सुमारास वापरले असल्याचे आढळते.

Answered by shankarkad296
1

Answer:

yg gy # 2dig ,dwg wduhdwgu, dugxg dug gdv x vg rg ,r

Explanation:

  1. खिधटिफ रैछरषैठरजेफycycyv5f h gug yg y
Similar questions