भारतातील भूकंप प्रवण क्षेत्रांचे वर्गीकरण
प्रदेश जोखमीची पातळी केंद्रशासित प्रदेश/राज्य
१
अतिशय कमी
7
२
कमी
३
मध्यम
X
उच्च
५
अति उच्च
Answers
Answer:
Explanation:
एक भूपट्ट दुसऱ्या भूपट्टाखाली अशा पद्धतीने सरकण्याच्या या प्रक्रियेला अधोगमन (Subduction) असे म्हणतात. हे भूपट्ट एकमेकांवर आदळण्यापूर्वी टेथिस नावाच्या समुद्रामुळे हे भूपट्ट दोन तुकड्यांत विभागले गेले होते. पृथ्वीच्या शिलावरणाचा काही पृष्ठभाग महासागरांनी व्यापलेला असून उरलेला भाग हा खंडांनी व्यापलेला आहे. महासागरांच्या खालच्या भूपट्टांमध्ये ते अधिक खोलीवर असल्याने त्यांच्यामध्ये दुसऱ्या भूपट्टाविरूद्ध अभिसरण घडण्याची प्रक्रिया अधिक प्रमाणावर घडते. याउलट, खंड शिलावरणाजवळ असून अधिक तरणशील असल्याने त्यांची पृथ्वीच्या पृष्ठभागाजवळ राहण्याची शक्यता वाढते. जेव्हा दोन खंड अभिसारित होतात, तेव्हा ते मोठ्या प्रमाणावर संकुचित आणि घट्टसर होत जातात. यालाच संकुचन (Shortening) आणि सांदीभवन (Thickening) असे म्हणतात. याचे उत्तम उदाहरण म्हणजे हिमालय पर्वत आणि तिबेटचा भाग.
भारतातील तीन प्रमुख भूविवर्तनीय उपप्रदेश म्हणजे उत्तरेकडील अफाट हिमालय, गंगा आणि इतर उपनद्यांचा मैदानी प्रदेश आणि द्वीपकल्प (Peninsula). हिमालयात, प्रामुख्याने टेथिस समुद्रात मोठ्या भूगर्भीय कालखंडात साठलेल्या गाळाचा समावेश होतो. खोल जलोढ (Alluvium) असलेले हिंद-गंगा खोरे म्हणजे हिमालयाच्या भारामुळे भूखंडात निर्माण झालेले मोठे गर्त (Great Depression) होय. देशातील द्वीपकल्पाच्या भागात भूतकाळातील हिमालयसदृश समाघातामुळे (Collision) विकृत झालेल्या पुरातन खडकांचा समावेश होतो. जमिनीचे क्षरण (Erosion) किंवा ऊन, पाऊस आणि वारा यांमुळे धूप होऊन अनेक पुरातन खडकांची मुळे उघडी पडतात. परिणामी मूळच्या स्थलाकृती पूर्णपणे बदलून जातात. सामान्यतः खडक अतिशय कठीण असतात, परंतु अपक्षयनामुळे (Weathering) त्यांचा पृष्ठभाग मृदू होतो. हिमालयीन समाघातापूर्वी, कित्येक दशलक्षवर्षे आधी भारताच्या द्वीपकल्पीय भागाच्या मध्यभागातून लाव्हारस वाहिल्यामुळे बेसॉल्ट खडकांचे थर परसलेले दिसतात. कच्छसारख्या किनारी प्रदेशांमध्ये सागरी गाळ (Deposits) साठलेला दिसून येतो जो कित्येक लक्ष वर्षांपूर्वी या सागराखाली निमज्जन (Submergence) झालेल्या घटनेचा पुरावा होय.