Geography, asked by nayanbhagat2, 2 months ago

भारतातील हवामान व ब्राझील हवामान ( फरक स्पष्ट करा)​

Answers

Answered by piperrockellepragya
1

Answer:

बायतातीर ऩजन्ा मावाठी प्राभख्ु माने नैऋत्म भोवभी लाये (भान्वनू लाये) कायणीबतू आशेत

Explanation:

HOPE THIS HELPS PLEASE MARK AS BRAINLIEST.

Answered by riyabante2005
10

भारत व ब्राझील या देशांमधील हवामानातील फरक

पुढीलप्रमाणे आहे :

(१) भारतात मान्सून प्रकारचे हवामान आढळते. याउलट, ब्राझील देशात उष्ण कटिबंधीय स्वरूपाचे हवामान आढळते.

(२) सर्वसाधारणपणे भारताच्या दक्षिण भागात तुलनेने जास्त तापमान व उत्तर भागात तुलनेने कमी तापमान आढळते. याउलट, ब्राझील देशाच्या उत्तर भागात तुलनेने जास्त तापमान व दक्षिण भागात तुलनेने कमी तापमान आढळते.

(३) सर्वसाधारणपणे भारताच्या दक्षिण भागात पर्जन्याचे प्रमाण तुलनेने अधिक व उत्तर भागात पर्जन्याचे प्रमाण तुलनेने कमी असते. याउलट, ब्राझीलच्या उत्तर भागात पर्जन्याचे प्रमाण तुलनेने अधिक व दक्षिण भागात पर्जन्याचे प्रमाण तुलनेने कमी असते.

(४) सर्वसाधारणपणे भारताच्या किनारपट्टीच्या प्रदेशात उष्ण व दमट हवामान आढळते. याउलट, ब्राझीलच्या पूर्व किनारपट्टीच्या प्रदेशात तुलनेने सौम्य व समशीतोष्ण हवामान आढळते.

Similar questions