Geography, asked by pranaybaing23, 9 months ago

भारतात लोकसंख्या वितरण असमान असण्याची कारणे कोणती?

Answers

Answered by Sauron
20

Explanation:

प्रस्तावना:

कोणत्याही देशाची प्रगती करण्यासाठी तसेच देश विभाग यांची योग्य प्रकारे नियोजन करण्यासाठी लोकसंख्येची संख्यात्मक आणि गुणात्मक माहिती उपयोगी पडते. संपूर्ण पृथ्वीवर लोकसंख्येचे वितरण असमान आहेत यासाठी अनेक प्रकारची कारणे कारणीभूत ठरतात काही कारणे पुढील प्रमाणे आहेत.

अ). भौगोलिक घटक:

लोकसंख्येच्या वितरणावर या घटकांचा मोठ्या प्रमाणात परिणाम होतो.

उदाहरणार्थ-

पृथ्वीवर आणि प्रकारचे भूमी स्वरूपे आहेत

जसे:

१).पर्वतीय प्रदेश: या भागात वातावरण मानवी वस्तीस अनुकूल नसते पर्वती भाग असल्यामुळे दळणवळणाच्या सुविधा कमी प्रमाणात उपलब्ध असतात त्यामुळे तिथे लोकसंख्या कमी दिसून येते.

२). पठारी प्रदेश: पठारी प्रदेश मध्ये काही भागात शेतीसाठी अनुकुल वातावरण हवामान असल्यामुळे त्या प्रदेशांमध्ये लोकसंख्या जास्त आढळून येते.

जसे :दख्खनचे पठार

३). मैदानी प्रदेश: मैदानी प्रदेशामध्ये मुबलक प्रमाणात जलसंपदा, शेतीसाठी सुपीक मृदा तसेच आवश्यक अनुकूल हवामान असल्यामुळे तेथे लोकसंख्या जास्त आढळते.

ब). आर्थिक घटक:

१). वाहतूक व दळणवळणाची सोय:

वाहतूक व दळणवळण याचा परिणाम मानवी वस्ती वाढण्यासाठी परिणाम करतो . दळणवळणाच्या सोयी मोठ्या प्रमाणात उपलब्ध असतील तर वाहतूक करण्यास मानवास सोपे ठरते. अप्रत्यक्षरीत्या अशा प्रदेशांमध्ये लोकसंख्या जास्त आढळते.

२). औद्योगिकीकरण:

औद्योगिकरणामुळे अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात कारखान्याची निर्मिती होऊ लागली आणि तिथे रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या त्यामुळे मानवास रोजगाराच्या संधी उपलब्ध होतात अशा ठिकाणी लोकसंख्या जास्त आढळून येते.

अशा अनेक घटकांचा लोकसंख्येच्या वितरणावर परिणाम होतो त्यामुळेच भारतामध्ये लोकसंख्येचे वितरण असमान दिसून येते.

Answered by appagodase2004
0

Answer:

  1. लोकसंख्येचे खंडणीहाय वितरण हे संख्या आणि घनता या दोन्ही दृष्टीने असमान दिसत आहे
  2. लोकसंख्येचे खंडणीहाय वितरण हे संख्या आणि घनता या दोन्ही दृष्टीने असमान दिसत आहेजास्त लोकसंख्येच्या प्रदेशात ते प्रकर्षाने जाणवते
  3. लोकसंख्येचे खंडणीहाय वितरण हे संख्या आणि घनता या दोन्ही दृष्टीने असमान दिसत आहेजास्त लोकसंख्येच्या प्रदेशात ते प्रकर्षाने जाणवतेलोकसंख्या वितरणाचा आकृतीबंध व लोकसंख्येची घनता यामुळे एखाद्या क्षेत्रातील लोकसंख्या शास्त्रीय वैशिष्ट्ये सहजपणे जाणून घेता येतात
Similar questions