India Languages, asked by MahakSandipchahande, 1 month ago

भारतातील प्रधानमंत्रयाची नावे लिहा व त्यांच्या कार्याची माहिती लिहा.​

Answers

Answered by narrasnehitha
0

Explanation:

Bharatatil prime minister yachi nave liha and tyanchya karyachi information liha.

Answered by manasi3151
1

Answer:

Home Information

भारतातील पंतप्रधानांच्या नावांची यादी आणि त्यांचे जीवन परिचय

Bhartache Pantpradhan List

आपल्या भारत देशाला १९४७ साली स्वातंत्र्य मिळालं. त्यानंतर पहिल्यांदाच देशात पंतप्रधान पदाकरिता निवडणुका घेण्यात आल्या होत्या. त्या निवडणुकीमध्ये महात्मा गांधींच्या म्हणण्यानुसार ‘भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस’ चे नेता, पंडित जवाहरलाल नेहरू यांना भारताचे पहिले पंतप्रधान बनविण्यात आलं होतं.

भारताला स्वातंत्र्य मिळण्यापूर्वी आपला देश गुलामीच्या बेड्यांमध्ये अडकलेला होता. स्वातंत्र्यपूर्व काळात आपल्या देशात वेगवेगळे राजे होऊन गेले.

ते राजे आपल्या नियमांनुसार कायदे बनवत असतं आणि त्या नियमांचे पालन प्रांतातील प्रजेला करावं लागत असे.

राजेशाही परंपरेनुसार प्रजेला आपल्या इच्छेनुसार राजा सुद्धा निवडता येत नव्हतां. त्याकाळी राजा हा वारसाहक्कानुसार निवडला जात होता.

उदारणार्थ एखाद्या राजकुमाराचे वडिल शासन करत असतील तर त्यांच्या मृत्यू नंतर वारसाहक्काने प्रांताच्या उत्तराधिकारी पदी स्वत: च्या मुलाला बहाल करत.

भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर, वेगवेगळया भागामध्ये विभागल्या गेलेल्या भारत देशाला एकत्रित करून, देशात एकच सत्ता असावी याकरता पंतप्रधान पदाची स्थापना करण्याचा निर्णय घेण्यात आला.

भारताच्या संविधानात पंतप्रधानांना देशातील तसचं, देशाच्या सरकारमधील सर्वात महत्वाचे व्यक्ती म्हणून दर्शविले आहे.

पंतप्रधान हे राष्ट्रपतींचे मुख्य सल्लागार, लोकसभेत बहुमताने निवडून आलेल्या पार्टीचे नेता, आणि मंत्रिपरिषदेचे प्रमुख असतात.

देशाची कार्यप्रणाली सुरळीतपणे चालविण्याकरता ते जबाबदार व्यक्ती असतात. या बरोबरच पंतप्रधान भारत सरकारच्या कार्यकारणीचे नेतुत्व देखील करतात.

याचाच अर्थ असा होतो की, देशाच्या संविधानात लिहिल्याप्रमाणे पंतप्रधानांकडे सर्वच प्रकारचे वास्तविक अधिकार असतात.

पंतप्रधान हे संसदेच्या मंत्रिमंडळाचे प्रमुख असुन, ते आपल्या मतानुसार त्यांच्या मंत्रिमंडळाच्या समितीत कोणत्याही प्रकारचा बद्दल आणायचा असल्यास त्यांना पूर्ण अधिकार असतो..

पंतप्रधान आपल्या मतानुसार त्यांच्या मंत्रिमंडळातील कोणत्याही सदस्याला मंत्री पद बहाल करू शकतात, त्याचं प्रमाणे सदस्याला त्याच्या मंत्री पदावरून निलंबित करण्याचा सुद्धा त्यांना पूर्ण अधिकार असतो.

राष्ट्रपती हे केंद्र सरकारमधील एक नामधारी शासक असतात.

पंतप्रधान हे देशाच्या सरकारचे प्रमुख सदस्य तर, राष्ट्रपती हे राष्ट्राच्या प्रमुख पदी असतात. पंतप्रधानांना त्यांच्या पदाची आणि गोपनीयतेची शपथ ही, देशाच्या राष्ट्रपती कडून देण्यात येते.

आपला भारत देश जगातील सर्वात मोठा लोकशाहीयुक्त प्रजासत्ताक राज्य आहे. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यापासून १९४७ ते २०१९ पर्यंत भारतात १५ असे प्रधानमंत्री होऊन गेले आहेत ज्यांनी आपला पंतप्रधान पदाचा कार्यकाळ पूर्ण वेळ सांभाळला आहे.

आपल्या भारत देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी जवळपास ‘सहा हजार एकशे तीस’ दिवसांपर्यंत आपल्या पंतप्रधान पदाची जबाबदारी सांभाळली होती.

यानंतर, देशाच्या पहिल्या महिला पंतप्रधान म्हणून “इंदिरा गांधी” यांनी जवळ जवळ ‘पाच हजार आठ्शे एकोणतीस’ दिवस सत्तेवर राहिल्या.

तर, पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी सुद्धा जवळ जवळ ‘दहा’ वर्षांपर्यंत म्हणजेच ‘तीन हजार सहाशे छपन्न’ दिवस आपला कार्यभार सांभाळला आहे.

पंतप्रधान मनमोहन सिंग यांचा कार्यकाळ संपल्यानंतर २०१४ सालापासून या महत्वपूर्ण पदाची जबाबदारी “बीजेपी पक्षाचे सदस्य नरेंद्र मोदी” सांभाळत आहेत.

भारताला स्वातंत्र्य मिळाल्यापासून आतापर्यंत सर्व पंतप्रधानांची नावे, तसचं त्यांचा कार्यकाल आणि त्याचं संक्षिप्त वर्णन आम्ही आपल्याला खाली देणार आहोत, त्या पूर्वी आपण या यादीकडे एकवेळ लक्ष द्यावे-

भारतातील पंतप्रधानांच्या नावांची यादी आणि त्यांचे जीवन परिचय- Prime Minister of India List and Biography in Marathi

Prime Minister of India List

भारतातील सर्व पंतप्रधानांची नावे आणि त्यांच्या कार्यकाळाची यादी- Indian Prime Ministers List in Marathi

क्रमांक- प्रधानमंत्री- कार्यकाल- राजनीतिक पक्ष

पंडित जवाहरलाल नेहरू- १५ ऑगस्ट १९४७- २७ मे १९६४- कॉंग्रेस

श्री. गुलजारीलाल चंद – २७ मे १९६४ – ९ जून १९६४ – कॉंग्रेस

श्री. लालबहादुर शास्त्री – ९ जून १९६४ – 11 जानेवारी १९६६ – कॉंग्रेस

श्री. गुलजारी लाल नंदा – 11 जानेवारी १९६६ – २४ जानेवारी १९६६- कॉंग्रेस

श्रीमती इंधीरा गांधी – २४ जानेवारी १९६६ – २४ मार्च १९७७ – कॉंग्रेस

श्री मोरारजी देसाई – २४ मार्च १९७७ – २८ जुलै १९७९ – जनता पार्टी

श्री चरण सिंग – २८ जुलै १९७९ – १४ जानेवारी १९८० – जनता पार्टी

श्रीमती इंदिरा गांधी – १४ जानेवारी १९८० – ३१ ऑक्टोबर १९८४ – कॉंग्रेस

श्री राजीव गांधी – ३१ ऑक्टोबर १९८४ – २ डिसेंबर १९८९ – जनता दल

श्री विपी सिंग – २ डिसेंबर १९८९ – १० डिसेंबर १९९० – जनता दल

श्री चंद्र शेखर – १० डिसेंबर १९९० – २१ जून १९९१ – सपा

श्री पी.वी. नरसिम्हा राव – २१ जून १९९१ – १६ मे १९९६ – कॉंग्रेस

श्री अटल बिहारी वाजपेयी – १६ मे १९९६ – १ जून १९९६ – बीजेपी

श्री एच डी देवगौडा – १ जून १९९६ – २१ एप्रिल १९९७ – जनता दल

श्री इंद्र कुमार गुजराल – २१ एप्रिल १९९७ – १९ मार्च १९९८ – जनता दल

श्री अटल बिहारी वाजपेयी – १९ मार्च १९९८ – १३ ऑक्टोबर १९९९ – बीजेपी

श्री अटल बिहारी वाजपेयी – १३ ऑक्टोबर १९९९ – २२ मे २००४ – बीजेपी

मनमोहन सिंग – २२ मे २००४ – २६ मे २०१४ – कॉंग्रेस

श्री नरेंद्र मोदी – २६ मे २०१४ पासून आज पर्यंत – बीजेपी

Similar questions