History, asked by omkargaikwad80104480, 21 days ago

भारतातील पर्यटन व्यवसायाची वैशिष्ट्ये स्पष्ट करा​

Answers

Answered by sharma78savita
14

Answer:

भारतातील पर्यटन हे देशातील अर्थव्यवस्थेसाठी महत्त्वाचे आहे आणि ते वेगाने वाढत आहे. वर्ल्ड ट्रॅव्हल अ‍ॅण्ड टुरिझम कौन्सिलने असे अनुमान काढले आहे की २०१८ मध्ये पर्यटनाने १६.९१ लाख कोटी रूपये (यूएस डॉलर २४० अब्ज) किंवा भारताच्या जीडीपीच्या ९.२% उत्पन्न कमावले.[१] पर्यटनाने ४२.६७३ दशलक्ष रोजगारांना पाठिंबा दिला, जे एकूण रोजगारातील ८.१% आहे. या क्षेत्राची वार्षिक वाढ ६.९% दराने होईल असा अंदाज आहे.[२] हैदराबाद आंतरराष्ट्रीय विमानतळ हे भारतातील एकमेव विमानतळ आहे जे जगातील पहिल्या दहा विमानतळांपैकी एक आहे.[३] ऑक्टोबर २०१५ मध्ये भारताच्या वैद्यकीय पर्यटन क्षेत्राची किंमत ३ अब्ज अमेरिकी डॉलर इतकी होती.[४] २०१४ मध्ये १.८ लाख परदेशी रुग्णांनी वैद्यकीय उपचार घेण्यासाठी भारतात प्रवास केला

Answered by rajraaz85
2

Answer:

भारतात पर्यटन व्यवसायाला खूप मोठी चालना मिळालेली आहे. आणि आपल्या अर्थव्यवस्थेत भर पडत आहे. अनेक व्यवसायांपैकी हासुद्धा एक महत्त्वाचा व्यवसाय आहे.

भारतीय पर्यटन व्यवसायाची वैशिष्ट्ये पुढील प्रमाणे आहेत-

1.भारतात पर्यावरणाशी निगडित पर्यटनाला महत्व दिले जात आहे. मंदिरे, अभयारण्य, ऐतिहासिक व सांस्कृतिक ठिकाणे, लेणी, स्वच्छ समुद्रकिनारे इत्यादी गोष्टींमुळे भारतीय पर्यटन व्यवसायाला खूप मोठा प्रतिसाद मिळत आहे.

2. आंतरराष्ट्रीय पर्यटक आपल्या ऐतिहासिक व सांस्कृतिक स्थळांना भेट देण्यास येत असतात.

3. आंतरराष्ट्रीय पर्यटकांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे आपल्या अर्थव्यवस्थेत सुद्धा वाढ झालेली दिसून येते.

4. भारतातील बहुसंख्य लोक एकत्र कुटुंबाने सर्वांना आनंद साजरा करता येईल अशा ठिकाणी जाणे पसंत करतात. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्व लोक त्या जागेचा आनंद घेऊ शकतील अशी जागा पर्यटन म्हणून लोक पसंत करतात.

Similar questions
Math, 7 months ago