भारतातील शेती मुख्यात्वे कोणत्या प्रकारची आहे ?
Answers
Answer:
बागायती
कारण ; अशा प्रकाराच्या शेतीमुळे अधिक प्रमाणात पिके येतात म्हणुन भारतातील शेती मुख्यत्वे बागायती प्रकारची आहे
Answer:
शेती हा भारतातील प्रमुख व्यवसाय आहे. प्राचीन काळापासून शेती हा व्यवसाय चालू आहे. शेती मनुष्याच्या उपजीविकेचे साधन आहे. भारतातील शेती ही मुख्यत्वे निर्वाह प्रकारची आहे. भारतात रब्बी व खरीप असे दोन हंगामात शेती केली जाते. ज्या ठिकाणी जास्त पाणी आहे त्या भागात बागायती शेती तर ज्या भागात पाण्याचे प्रमाण कमी आहे अशा भागात जिरायती शेती केली जाते.
भारतात ६०%भूभाग हा लागवडीखाली येतो. अनुकूल हवामानाचा दीर्घ कालावधी, सुपीक मृदा, हवामानातील बदल, इत्यादी घटक भारतातील शेती व्यवसायासाठी महत्त्वपूर्ण ठरले आहे.
भारतात बाजरी, मका, तांदूळ, गहू, ज्वारी, ही पिके घेतली जातात. वेगवेगळ्या प्रकारची फळे, पालेभाज्या व मसाल्याचे पदार्थ भारतात पिकवले जातात. तसेच चहा, कॉफी, रबर, ताग इत्यादी नगदी पिके सुद्धा भारतामध्ये घेतली जातात.
कापूस, आंबे, रेशीम कापड, मसाल्याचे पदार्थ, चहा इत्यादी गोष्टींची निर्यात भारतातून केली जाते.