भारतातील शेतकरी चळवळीचे स्वरूप स्पष्ट करा.
Answers
i dont understand ur language.
भारतातील शेतकरी चळवळीचे स्वरूप स्पष्ट करा.
उत्तर :-
भारतातील शेतकरी चळवळ ह्या स्वातंत्रपूर्व काळापासून चालत आलेल्या चळवळींपैकी एक आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात बार्डोली, चंपारण्य, खोटीच प्रश्न, अश्या शेतकऱ्यांच्या चळवळी झाल्या होत्या. महात्मा फुले, न्यायमूर्ती रानडे, महात्मा गांधी यांसारख्या नेत्यांनी किसान सभेसारख्या संघटना स्थापन केल्यात.यात मुख्यतः शेतकऱ्यांच्या मागण्या व त्यांचे प्रश्न मांडण्यात आलेत. शेतीमालाला योग्य भाव मिळावा तसेच शेतीला उद्योगाचा दर्जा मिळावा. उत्पादन खर्च वगळता शेतीमालाचा हमीभाव ५०% असावा. शेतीमालाला आधारभूत किंमत मिळावी. परदेशातून आयात केलेल्या शेतमालावर आयात कर लावावा. दुष्काळ,पूर वगैरे आपत्तींपासून वाचविण्यासाठी 'कृषी आप्तकाल निधी' ची स्थापना करावी. शेतीला कायमस्वरूपी सिंचन व वीजपुरवठा करावा. पीककर्जावरील व्याजाचा दार कमी करावा. शेतकऱ्यांना वाजवी भावात बी-बियाणे व यंत्रसामग्री उपलब्ध करून द्यावी अश्या स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशी स्वीकाराव्यात, कर्जमाफी,कर्जमुक्ती यांबाबत धोरण ठरवावे. स्वातंत्र्योत्तर काळात कुल कायद्यासारख्या कायद्यांनी शेतकरी चालवली मंदावल्या, हरितक्रांतीने गरीब शेतकऱ्यांची स्थिती सुधारली.
वरील प्रकारे भारतातील शेतकरी चळवळीचे स्वरूप स्पष्ट करता येईल.