भारतातील शेतकरी कर्जबाजारी का झाले
Answers
Answered by
11
Answer:
Explanation:
इंग्रजांनी भारतात महसूल गोळा करण्याच्या पद्धतीत महत्त्वाचे बदल केले . त्यांनी शेतकऱ्यांना शेतसारा रोख रोकमेत व ठराविक वेळेत भरावा अशी सक्ती केली . हा शेतसारा वेळेत न भरल्यास शेतकऱ्यांची जमीन जप्त केली जाईल असा नियम केला . शेतकरी शेतसारा भरण्यासाठी येईल त्या किमतीला पीक विकू लागले . व्यापारी व दलाल वाजवीपेक्षा कमी दराने त्यांचा माल खरेदी करू लागले . प्रसंगी शेतकऱ्यांना शेतसारा भरण्यासाठी सावकाराकडे जमीन गहाण टाकून कर्ज घ्यावे लागले .त्यामुळे भारतातील शेतकरी कर्जबाजारी झाले
Answered by
1
भारतातील शेतकरी कर्जबाजारी:-
- नव्या जमीन महसूलव्यवस्थेचे अनिष्ट परिणाम ग्रामीण जीवनावर झाले. शेतसारा भरण्यासाठी येईल त्या किमतीला शेतकरी पीक विकू लागले . व्यापारी व दलाल वाजवीपेक्षा कमी दराने त्यांचा माल खरेदी करू लागले . प्रसंगी शेतकऱ्यांना सारा भरण्यासाठी सावकाराकडे जमीन गहाण टाकून कर्ज घ्यावे लागे. कर्जफेड झाली नाही तर त्यांना आपल्या जमिनी विकाव्या लागत . सरकार , जमीनदार , सावकार , व्यापारी हे सर्व शेतकऱ्यांचे शोषण करत असत . त्यामुळे शेतकरी कर्जबाजारी झाले .
- ब्रिटिश राजवटीत देशावर प्रथमच एकछत्री अंमल निर्माण झाला. त्यापूर्वी देशात सरंजामशाही व राजे-रजवाडे आणि संस्थानिकांची सत्ता होती.यांपैकी काही राजे व संस्थानिक यांनी शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेतले आणि शेतीला उपयुक्त सुधारणा केल्या तथापि धरणे बांधणे, कालवे तयार करणे, चोराचिलटांपासून शेतकऱ्यांच्या उत्पादनांचे रक्षण करणे, या सगळ्या कामांमध्ये शेतकऱ्यांना राजाच्या मर्जीवर, कृपाकटाक्षावर अवलंबून रहावे लागत होते.
- आपल्या व्यथा, मागण्या राजाच्या कानावर जरी त्यांना घालता येत असल्या, तरी त्या मागण्यांच्या पूर्ततेसाठी आंदोलन वगैरे त्या काळी शक्य नव्हते. मुळात शेकडो वर्षे भारतातील शेतकरी वर्षातील शेतीच्या हंगामात शेतीची कामे आणि उरलेल्या काळात लढाया, मजुरी असे दुहेरी जीवन जगत असल्याने शेतीवाडी व गावांचा विकास, संरक्षण या जबाबदाऱ्या त्यांना स्वबळावर पार पाडाव्या लागत होत्या. त्या काळी वस्तुविनिमयाची पद्धत रूढ होती.
- ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीने देशांमध्ये व्यापार करण्यास सुरुवात केली त्याकाळात युरोपातून आणलेल्या माल हा भारतामध्ये विकणे आणि भारतातील सुती आणि रेशीम कापड तसेच मसाल्याचे पदार्थ युरोपात प्रचंड प्रमाणात घेऊन जाण्यास सुरुवात केली कंपनीचे अधिकारी आणि व्यापारी लोक देशातील शेतकरी आणि मजूर तसेच जनतेची आर्थिक लूट करत असत या लोकांकडून कमी किमतीत जबरदस्तीने मालक घेत मिल्का सिंग यांनी १७६२ मध्ये याविरुद्ध गव्हर्नर कडे तक्रार केली होती परंतु त्याकडे फारसे लक्ष दिले गेले.
एऐ था, भारतातील शेतकरी कर्जबाजारी
#SPJ3
Similar questions