History, asked by aatmaramjadhav1957, 1 month ago

भारतातील विविध धर्माची नावे सांगा ? plz give fast ans​

Answers

Answered by Anonymous
1

Answer:

भारतातील धर्म धार्मिक श्रद्धा आणि प्रथा विविधतेने ओळखले जातात. भारतातील धर्मनिरपेक्षतेचा अर्थ म्हणजे राष्ट्रासाठी सर्व धर्म समान आहेत. १९७६ सालच्या ४२ व्या घटना दुरुस्तीच्या कायद्यानुसार भारत एक धर्मनिरपेक्ष राष्ट्र आहे. भारतीय उपखंड हा हिंदू, बौद्ध, जैन आणि शीख या जगातील चार प्रमुख धर्मांचे जन्मस्थान आहे. संपूर्ण भारताच्या इतिहासात 'धर्म' हा देशाच्या संस्कृतीचा महत्त्वाचा भाग आहे. कायदा आणि सुव्यवस्थाद्वारे देशांमध्ये धार्मिक विविधता आणि धार्मिक सहिष्णुता ह्या दोन्ही गोष्टी जपल्या जातात; भारताच्या संविधानाने धर्म स्वातंत्र्याचा हक्क हा मूलभूत अधिकार म्हणून घोषित केला आहे. जवळजवळ ९३% भारतीय आपापल्या धर्माचे पालन करताना आढळतात.

२०११ च्या जनगणनेनुसार, भारतामधील ७९.८% लोक हिंदू धर्मीय आहेत; त्याखालोखाल मुसलमान १४.२%, ख्रिश्चन २.३%, शीख १.९%, बौद्ध ०.७% व जैन ०.४% आहेत. या व्यतिरिक्त झोराष्ट्रीयन व यहूदी व इतर धर्म व प्रथांचे पालन करणाऱ्या नागरीकांचे प्रमाण ०.६% आहे. काही अभ्यासक आणि विद्वानांच्या मते भारताच्या लोकसंख्येत ५.५ ते ६% बौद्ध धर्मीय आहेत. धार्मिक विविधतेमुळेच आज भारतामधे अनेक धर्म व सामाजिक एकीकरण पाहावयास आढळतात. यातील काही धर्म भारतात आलेल्या व्यापारी, प्रवासी, आक्रमणकर्ते व राज्यकर्ते यांच्याकडून प्रचार केले गेलेले आहेत.

योग, ध्यान, आयुर्वेद चिकित्सा, होरा, कर्म व पुनर्जन्म या सारखे हिंदू व बौद्ध धर्माच्या तत्त्वज्ञानाशी निगडीत असलेले अनेक पैलू धर्मप्रचारकांनी पाश्चिमत्य देशांमधे लोकप्रिय केले आहेत. जगभरामधे हिंदू धर्माचा लक्षणीय असा प्रभाव पडलेला आहे. हरे कृष्णा चळवळ, ब्रह्मकुमारी, आनंद मार्ग अशा अनेक संस्था भारतीय अध्यात्मिक विचारांचे प्रवर्तन करत असतात.

Answered by chsumanth88762
0

Answer:

when u can translate

plz give fast ans

in english

why can't you translate full sentence in english

Similar questions